ग्रामपंचायत निकालाची फायनल आकडेवारी; भाजप नंबर 1 ही नेहमीची बातमी; पवार – ठाकरेंचे गारुड उतरले ही खरी बातमी!!

Gram Panchayat Result Final Statistics

विशेष प्रतिनिधी

मुंबई : राज्यातील तब्बल 2 हजार 359 ग्रामपंचायत निवडणुकींचा निकाल समोर आला. या निकालातून भाजप राज्यात नंबर 1 चा पक्ष आहे, ही खरी बातमीच नाही, कारण तो आहेच 1 नंबर वरचा पक्ष. पण महाराष्ट्रात पवार – ठाकरेंचा करिष्मा संपला ही खरी बातमी आहे!! Gram Panchayat Result Final Statistics

विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात अजित पवार यांनी बंड करून अख्खी राष्ट्रवादी काँग्रेस ताब्यात घेतली. त्यामुळे राज्याची जनता निवडणुकीत कुणाला साथ देते??, याबाबतची उत्सुकता होती.

राज्यातील 2359 ग्रामपंचायतींचा निकाल आज समोर आला. त्यात भाजप प्रणित महायुतीला प्रचंड कौल तर मिळालाच, पण शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचे महाराष्ट्रावरचे गारुड मतदारांनी संपुष्टात आणले. ते इतके की “पवार बुद्धीच्या” पत्रकारांची मती देखील कुंठित झाली. “ते” पवार आहेत. “ते” काहीही करू शकतात. पवारांच्या या बुद्धिचातुर्याचे अफाट वर्णन करणारे त्यांचे व्हिडिओ काल युट्यूब वर पडलेच नाहीत.

राज्यातील 2359 ग्रामपंचायतींपैकी भाजपची या निवडणुकीत सर्वाधिक 717 ग्रामपंचायतींवर सत्ता आली. त्यापाठोपाठ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाला 382 जागांवर यश मिळाले, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 273 जागांवर यश मिळाले. त्यांचा पक्ष या निवडणुकीत चौथ्या क्रमांकाचा पक्ष ठरला. भाजप नेहमीप्रमाणे मोठा भाऊ, तर अजित पवार गट दुसरा भाऊ ठरला. या तीनही पक्षांच्या महायुतीने सर्वाधिक तब्बल 1372 जागांवर विजय मिळवला, तर महाविकास आघाडीचा या निवडणुकीत सुपडा साफ झाला.

काँग्रेस 3 नंबरचा पक्ष, तर पवार 5, ठाकरे 6 व्या नंबरवर

याआधी सत्तांतर झाल्यानंतर पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकांमध्या महाविकास आघाडीने महायुतीवर बाजी मारलेली बघायला मिळाली होती. पण यावेळी महाविकास आघाडीची अत्यंत वाईट परिस्थिती बघायला मिळाली आहे. महाविकास आघाडीला या निवडणुकीत फक्त 638 जागांवर समाधान मानावं लागलंय. महाविकास आघाडीत काँग्रेस हा मोठा पक्ष ठरला आहे. तर पूर्ण निवडणुकीच्या निकालानुसार काँग्रेस हा राज्यात तीन नंबरचा पक्ष ठरला आहे. काँग्रेसला एकूण 293 जागांवर यश मिळाले, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पक्षाला फक्त 205 जागांवर समाधान मानावे लागले, तर ठाकरे गटाला सर्वात कमी अवघ्या 140 जागा मिळाल्या.

पक्षाच्या प्रमुखांना जनतेची नापसंती?

महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या दीड वर्षात अनेक घडामोडी घडल्या आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठी फूट पडली. त्यानंतर अनेक घडामोडी घडल्या. या घडामोडींनंतर जनतेने पक्षाच्या प्रमुखांना नाकारून बंडखोरांना कौल दिला. या निवडणुकीतून महाराष्ट्रातील जनतेचा नेमका मूड काय? याबाबत अनेकजण अंदाज लावू शकतात.

Gram Panchayat Result Final Statistics

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात