महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांची बेरीज केली तरी त्याच्या दुप्पट यश एकट्या भाजपाला जागा मिळाल्या आहेत. Deputy Chief Minister Fadnavis reaction on BJPs success in Gram Panchayat elections
विशेष प्रतिनिधी
मुंबई : ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल मंगळवारी लागले आहेत. यामध्ये भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. त्यानंतर अजित पवार गट आणि शिंदे गटाला यश मिळालं आहे. यामुळे या निवडणुकीत महायुतीचं पारडं हे महाविकास आघआडीच्या तुलनेत भारी ठरलं आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री यांनी विशेष प्रतिक्रिया दिली आहे.
फडणीस म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात आणि भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या मार्गदर्शनात भाजपाची संपूर्ण देशात यशस्वी घौडदौड सुरू आहे. ‘पंचायत टू पार्लमेंट’ केवळ आणि केवळ आणि चप्पा-चप्पा भाजपा आहे. ”महाराष्ट्रातील ग्रामपंचायत निवडणुकीत 750 हून अधिक जागा जिंकत भाजपाने राज्यात क्रमांक एकचे स्थान पटकाविले आहे. राज्यातील महायुती सरकारच्या कामगिरीला सुद्धा हा राज्यातील जनतेने दिलेला सुस्पष्ट कौल आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वातील शिवसेना आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सुद्धा मोठे यश या निवडणुकीत मिळाले. राज्यातील महायुतीने एकत्रितरित्या 1400 हून अधिक ग्रामपंचायतींमध्ये दणदणीत विजय संपादन केला आहे.”
”राज्यातील जनतेवर त्यांच्या सरकारच्या काळात अतोनात सूड उगविणार्या महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांची बेरीज केली तरी त्याच्या दुप्पट यश एकट्या भाजपाला मिळाले आहे. महाराष्ट्रातील जनतेने आपला कौल दिला आणि तोही सुस्पष्ट दिला, त्यांचे खूप खूप आभार !”
”या विजयासाठी अहोरात्र परिश्रम करणार्या भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांचे मी अतिशय मनापासून अभिनंदन करतो. सतत प्रवास करणारे आणि कार्यकर्त्यांना प्रेरित करणारे आमचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचेही अभिनंदन! ठिकठिकाणचे खासदार, आमदार, पदाधिकारी यांचेही अभिनंदन. महायुतीतील सर्व घटक पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते यांचेही मी हार्दिक अभिनंदन करतो. नवनिर्वाचितांचे अभिनंदन आणि त्यांना भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा!” असं फडणवीस म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App