विशेष प्रतिनिधी
पुणे : दिवाळी हा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी खरेदीसाठी लगबग पाहायला मिळत आहे. त्याबरोबरच अनेकजण आपल्या प्रियजनांना, मित्रमंडळींना विविध भेटवस्तूही देताना दिसत आहेत. नुकतंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अभिनेत्री श्रेया बुगडेला एक भेटवस्तू पाठवली आहे. Shreya bugde news
उत्तम अभिनय आणि विनोदाचं अचूक टायमिंग साधत प्रेक्षकांना खळखळून हसवणारी अभिनेत्री म्हणजे श्रेया बुगडे. मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक म्हणून तिला ओळखले जाते. श्रेया बुगडेने ‘कॉमेडी क्वीन’ अशी ओळख मिळवली. नुकतंच तिने इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली आहे.
यात श्रेयाने एका भेटवस्तूचा फोटो शेअर केला आहे. या फोटोत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिलेल्या भेटवस्तू पाहायला मिळत आहेत. त्याबरोबरच त्यांनी दिपावली आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छाही दिल्या आहेत. तिने ही भेटवस्तू स्वीकारत त्यांचे आभार मानले आहेत.
हत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App