उत्तर प्रदेश : अलिगडचे नाव बदलणार! हरिगड ठेवण्याची तयारी सुरू, महापालिकेत प्रस्ताव मंजूर


अलीगडचे नाव बदलून हरिगड करण्याची मागणी अनेक दिवसांपासून होत आहे.


विशेष प्रतिनिधी

अलीगढ : उत्तर प्रदेशमध्ये आतापर्यंत अनेक रेल्वे स्टेशन आणि जिल्ह्यांची नावे बदलण्यात आली आहेत. आता पुन्हा एकदा राज्यातील महत्त्वाच्या जिल्ह्याचे नाव बदलण्याची चर्चा जोर धरू लागली आहे. यावेळी अलीगडचे नाव बदलून हरिगड करण्याची तयारी सुरू आहे.The name of Aligarh will change Preparations for placing Harigad are underway the proposal is approved in the Municipal Corporation



वास्तविक, अलीगढचे नाव बदलण्याचा प्रस्ताव अलिगड महापालिकेत आणण्यात आला होता. हा प्रस्ताव महापालिकेने मंजूर केला आहे. अशा स्थितीत अलीगडचे हरिगडमध्ये रूपांतर करण्याचा मार्ग आणखी सोपा झाला आहे.

अलीगडचे नाव बदलण्याच्या प्रस्तावावर माहिती देताना अलीगढचे महापौर प्रशांत सिंघल म्हणाले की, काल झालेल्या बैठकीत अलीगडचे नाव बदलून हरिगड करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. त्यास सर्व नगरसेवकांनी एकमताने पाठिंबा दिला.

आता हा प्रस्ताव प्रशासनाकडे पाठवण्यात येणार आहे. मला आशा आहे की प्रशासन याची दखल घेईल आणि अलीगडचे नाव बदलून हरिगड करण्याची आमची मागणी पूर्ण करेल. ही मागणी अनेक दिवसांपासून होत आहे.

The name of Aligarh will change Preparations for placing Harigad are underway the proposal is approved in the Municipal Corporation

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात