वृत्तसंस्था
नवी दिल्ली : धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर तमाम भारतीयांनी तब्बल 30 हजार कोटी रुपयांचे सोने – चांदी खरेदी केले. All Indians bought silver and gold worth 30,000 crores on Dhantrayodashi
बाजारपेठा मध्यरात्री पर्यंत खुल्या होत्या आणि लोक खरेदी करत होते. पार्किंग फूल्ल होते आणि रस्ते जाम झाले होते. धनत्रयोदशीला संध्याकाळी 6.00 वाजेपर्यंत 27,000 कोटी रुपयांच्या सोन्याची विक्री झाली. धनत्रयोदशीच्या शुभ मुहूर्तावर देशभरात सोन्या-चांदीचा अधिकृत व्यापार 30,000 कोटी रुपयांचा झाला.
देशव्यापी व्यापार (दागिने आणि इतर सण-संबंधित खरेदीचा) 50,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे, ज्यामध्ये एकट्या दिल्लीचे योगदान 5,000 कोटी रुपये आहे, असा अंदाज कन्फेडरेश ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स CAIT ने वर्तविला. 2023 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कॉल व्होकल फॉर लोकल जबरदस्त चालला.
लोकांनी स्वदेशी वस्तू खरेदीवरच भर दिला. त्याचा चिनी वस्तूंच्या मार्केटला मोठा धक्का बसला. लोकांनी चिनी बनावटीच्या वस्तू घेणे कटाक्षाने टाळले, असे CAIT चे प्रमुख प्रवीण खंडेलवाल यांनी सांगितले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App