‘भारताला लवकरच मिळणार MQ-9B ड्रोन’ ; अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे मोठे वक्तव्य!


केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्यासोबत अनेक महत्त्वपूर्ण मुद्य्यांवर झाली चर्चा India to get MQ 9B drone soon A big statement by the US defense minister

विशेष प्रतिनिधी

दिल्ली : संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी अमेरिकन संरक्षणमंत्री लॉयड ऑस्टिन यांच्याशी अनेक मुद्द्यांवर चर्चा केली. ते म्हणाले की, चीनच्या आक्रमकतेला तोंड देण्यासाठी भारत आणि अमेरिका यांच्यात सामरिक मुद्द्यांवर एकमत होत आहे. द्विपक्षाीय चर्चेच्या पाचव्या आवृत्तीदरम्यान भारताशी झालेल्या चर्चेनंतर ऑस्टिन म्हणाले, भारताला लवकरात लवकर ड्रोन क्षमता मिळावी यासाठी सरकार या दिशेने सतत प्रयत्न करत आहे.

ऑस्टिन म्हणाले, आम्ही बैठकीत सुरक्षा आव्हाने आणि चीनकडून निर्माण झालेल्या धोक्यावर चर्चा केली, परंतु आमचे संपूर्ण संभाषण केवळ या मुद्द्यावर केंद्रित नव्हते. MQ-9B ड्रोनबाबत अमेरिकेचे संरक्षण मंत्री म्हणाले की, मला आज कोणतीही नवी घोषणा करण्याची गरज नाही. योग्य वेळी ते जाहीर करू. भारताला ही क्षमता मिळावी यासाठी आम्ही सर्व काही करत आहोत. आम्ही एक बुलेटप्रुफ वाहनाचीही निर्मिती करत आहोत.

भारत-अमेरिका 2+2 मंत्रीस्तरीय बैठक शुक्रवारी सुरू झाली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले की, “स्वतंत्र, मुक्त आणि नियमबद्ध इंडो-पॅसिफिक प्रदेश सुनिश्चित करण्यासाठी दोन्ही देशांमधील भागीदारी महत्त्वपूर्ण आहे”. भारताकडून राजनाथ यांच्याशिवाय परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी 2+2 मंत्रीस्तरीय चर्चेत भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व केले. यामध्ये अमेरिकेच्या बाजूचे नेतृत्व अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटोनी ब्लिंकन आणि अमेरिकेचे संरक्षण मंत्री लॉयड ऑस्टिन यांनी केले.

India to get MQ 9B drone soon A big statement by the US defense minister

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात