विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : दिल्लीतील रामलीला मैदानावर काॅंग्रेसतर्फे १ नोव्हेंबर रोजी आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. मात्र, यामुळे व्यापारावर परिणाम हाेणार असल्याने दिवाळीनंतर माेर्चा काढावा अशी विनंती व्यापारी संघटनांतर्फे काॅंग्रेसच्या माजी अध्यक्षा साेनिया गांधी यांना पत्र लिहून करण्यात आली आहे. Sonia Gandhi
लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी म्हटले आहे की, ‘व्होट चोरी’ रोखण्यासाठी आणि लोकशाही वाचवण्यासाठी हा मोर्चा काढण्यात येत आहे. पोलिसांच्या कारवाईची किंवा लाठ्यांची भीती बाळगू नका. या पार्श्वभूमीवर दिल्लीतील व्यापाऱ्यांनी आता सोनिया गांधी यांना पत्र लिहून आंदोलन झाल्यास १२ हजार कोटींचे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली आहे.
चेंबर ऑफ ट्रेड अँड इंडस्ट्रीने (सीटीआय) काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांना रॅली पुढे ढकलण्याचे आवाहन केले आहे. संघटनेच्या मते या रॅलीमुळे दिल्लीतील २० प्रमुख बाजारपेठांमधील व्यवसायावर परिणाम होऊ शकतो, ज्यामुळे अंदाजे १०,००० ते १२,००० कोटी रुपयांच्या व्यापारावर संभाव्य परिणाम होऊ शकतो. या रॅलीमुळे राजधानीत प्रचंड वाहतूक कोंडी होऊ शकते, ज्यामुळे ग्राहक आणि व्यापाऱ्यांना बाजारपेठांमध्ये पोहोचण्यास अडचण येईल. ही रॅली दिवाळीनंतर आयोजित केली जावी. जर रॅली पुढे ढकलणे शक्य नसेल, तर तिचे ठिकाण बदलून बुराडी ग्राउंड करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
१२ हजार कोटी रुपयांचा दैनंदिन व्यवसाय ठप्प होईलआम्ही रॅलीला विरोध करत नाही. दिवाळीच्या ऐन हंगामात आमची उपजीविका वाचवण्यासाठी हात जोडून विनवणी करत आहोत. ६ नोव्हेंबरला धनत्रयोदशी आहे, ८ नोव्हेंबरला दिवाळी आहे. १ नोव्हेंबर हा तयारीचा ऐन दिवस असतो. जर १ नोव्हेंबरला १० लाख लोक आणि १५ हजार ते २० हजार वाहने मध्य दिल्लीत आली, तर २० ऐतिहासिक बाजारपेठांमधील १० हजार ते १२ हजार कोटी रुपयांचा दैनंदिन व्यवसाय ठप्प होईल, असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.
दरम्यान, रामलीला मैदानापासून ५ किमीच्या परिसरात ३०० वर्षे जुन्या २० बाजारपेठा आहेत, ज्या संपूर्ण देशाला मालाचा पुरवठा करतात. १० ऑक्टोबर रोजी जंतर मंतरवर केवळ ५ हजार ते ७ हजार लोक आले होते, ज्यामुळे दिल्लीत आठ तास वाहतूक कोंडी झाली होती. आता १० लाख लोक येत आहेत. १ नोव्हेंबरची रॅली दिवाळीनंतर १०-११ नोव्हेंबर रोजी पुनर्निर्धारित करावी, जेणेकरून दिवाळीच्या काळात व्यवसायात व्यत्यय येणार नाही. जर रॅली होणारच असेल, तर ती रामलीला मैदानावरून बुराडी मैदानावर हलवावी, जिथे १५ हजार वाहनांसाठी पार्किंगची जागा आहे, अशी मागणी करण्यात आले आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App