अयोध्येतील राम मंदिरावर आता तारीख पे तारीख नाही, तर अमित शाहांनी दिली नेमकी तारीख!!

वृत्तसंस्था

आगरतळा : तारीख नोट करून ठेवा, पुढच्यावर्षी अयोध्येत १ जानेवारी २०२४ ला राम मंदिर बनून तयार झालेले असेल, अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी दिली आहे. त्रिपुरामधील जाहीर सभेत शाहांनी राम मंदिराच्या निर्माणाबाबत माहिती दिली आहे. १ जानेवारी २०२४ पर्यंत अयोध्येत राम मंदिर बनून तयार झालेले असेल, असे अमित शाह या सभेमध्ये सांगितले. Now there is no date on the Ram temple in Ayodhya, but the exact date given by Amit Shah!!

स्वातंत्र्यापासून कॉंग्रेसने राम मंदिराच्या उभारणीसाठी अनेक अडथळे आणले पण पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेत आल्यानंतर या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाकडून निर्णय देण्यात आला. मंदिराचे भूमिपूजन झाले आणि तातडीने कामाला सुरूवात झाली असेही अमित शाह म्हणाले.



कॉंग्रेसवर टीका

मोदी सरकारच्या काळात गोष्टी बदलल्या कॉंग्रेसच्या काळात पाकिस्तानातून घुसखोर येऊन आमच्या जवानांना मारुन निघून जात होते पण मोदी सरकारच्या काळात थेट सर्जिकल स्ट्राईक करून पाकिस्तानला भारताने धडा शिकवला. तसेच त्रिपुरातील भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारने ईशान्येकडील राज्यात दहशतवाद संपवून सर्वांगीण विकास केला असेही अमित शाह यांनी सांगितले.

Now there is no date on the Ram temple in Ayodhya, but the exact date given by Amit Shah!!

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात