अयोध्येत उभे राहणार महाराष्ट्र भवन; मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा होकार


प्रतिनिधी

मुंबई : राम जन्मभूमी ऐतिहासिक नगरी अयोध्येमध्ये महाराष्ट्र भवन उभारण्यासाठी जागा द्यायला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी तयारी दर्शवल्याने तिथे महाराष्ट्र भवन बांधण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली. त्यावेळी याविषयी चर्चा झाली. Maharashtra Bhavan to stand in Ayodhya; Chief Minister Yogi Adityanath’s

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे सध्या मुंबई  दौऱ्यावर आहेत. त्यांच्या स्वागतासाठी राजभवन येथे स्नेहभोजनाचे आयोजन केले होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी योगी आदित्यनाथ यांच्याकडे अयोध्येमध्ये ‘महाराष्ट्र भवन’ उभारण्यासाठी जागा देण्याची मागणी केली. या मागणीला योगी यांनी तत्वतः मंजुरी दिली.

 

तसेच, मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांना आपण लवकरच प्रभू श्रीरामाचे दर्शन घेण्यासाठी अयोध्या दौऱ्यावर येणार असल्याचेही सांगितले. त्यावर योगी यांनी समाधान व्यक्त करत उत्तर प्रदेश सरकारच्यावतीने आमंत्रित करून अयोध्येला आवर्जून भेट द्यावी, असेही मुख्यमंत्र्यांना सांगितले. यावेळी माजी केंद्रीय मंत्री राम नाईक, खासदार रवी किशन उपस्थित होते.

Maharashtra Bhavan to stand in Ayodhya; Chief Minister Yogi Adityanath’s

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात