वृत्तसंस्था
मुंबई : महाराष्ट्रात २ हजार ५२४ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण आढळले आहेत. २४ तासांत २५१ नव्या कोरोना रुग्णांची आणि शून्य मृत्यूची नोंद झाली. याच काळात राज्यातले ४४८ जण बरे झाले. राज्यात झालेल्या ७ कोटी ८६ लाख ४५ हजार ५१० कोरोना चाचण्यांपैकी ७८ लाख ७१ हजार २०२ पॉझिटिव्ह आल्या. Two thousand active patients in the state; Zero death record; 251 new patients fell in 24 hours
राज्यात आढळलेल्या ७८ लाख ७१ हजार २०२ कोरोना रुग्णांपैकी ७७ लाख २० हजार ९२२ बरे झाले. कोरोनामुळे राज्यात १ लाख ४३ हजार ७५२ जणांचा मृत्यू झाला. तसेच इतर कारणाने राज्यात ४००४ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. राज्याचा कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर ९८.०९ टक्के, पॉझिटिव्हिटी दर १०.०१ टक्के आणि मृत्यू दर १.८२ टक्के आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App