दारूबंदीसाठी उमा भारती यांचा एल्गार, दारूच्या दुकानात घुसरून थेट केली दगडफेक


विशेष प्रतिनिधी

भोपाळ: मध्य प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री उमा भारती यांनी दारूबंदीसाठी एल्गार सुरू केला आहे. त्या स्वत: यासाठी रस्त्यावर उतरल्या आहेत. भोपाळच्या बीएचईएव परिसरातील आझाद नगर येथील दारूच्या दुकानात घुसून उमा भारती यांनी दगडफेक केली.Uma Bharti’s Elgar broke into a liquor store and hurled stones directly at him

उमा भारती यांनी दारूच्या दुकानात दगड फेकतानाचा व्हिडीओ मोबाईलवरुन चित्रित करण्यात आला. हा व्हिडीओ उमा भारती यांनी त्यांच्या फेसबुक अकाऊंट वरुन शेअर केला आहे. सोशल मीडियावर यासंदर्भात पोस्ट करुन उमा भारती यांनी त्यांची भूमिका मांडली आहे.



मजुरांची वस्ती असून तिथं मंदिर आहे, लहान मुलांची शाळा आहे. ज्या वेळी महिला आणि मुली घरांच्या छतावर उभ्या असतात त्यावेळी दारू पिलेल्या लोकांच्या वर्तनामुळं त्यांना त्रास सहन करावा लागते.
उमा भारती यांनी मजुरांची सगळी कमाई या दारुच्या दुकानांवर उधळली जात असल्याचाही आरोप केला आहे.

या परिसरात राहणाºया महिलांनी याबाबत तक्रारी केल्या होत्या. त्याच्या मागणीला पाठिंबा देत उमा भारती या याठिकाणी जाऊन दारुच्या दुकाना जात दारुच्या बाटल्यांवर दगडफेक केली आहे. भारती यांनी दारू दुकानं बंद होण्यासाठी शिवराज सिंह चौहान यांच्याकडे मागणी केली आहे.

प्रशासनानं सातत्यानं या दुकानांवर कारवाई करत ती बंद करण्यासाठी आश्वस्त केलं होतं. मात्र अखेरपर्यंत कोणतीही कारवाई केली नव्हती. अखेर उमा भारती या दुकानांवर धडक देत दगडफेक करत प्रशासनाला इशारा दिलाय. प्रशासनानं दरवेळी दुकानं बंद करण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र, कित्येक वर्ष झाली दुकान बंद झाली नाहीत त्यामुळं आता मी प्रशासनाला येत्या आठ दिवसात दुकान बंद करण्याचा इशारा देत असल्याचं उमा भारती म्हणाल्या.

Uma Bharti’s Elgar broke into a liquor store and hurled stones directly at him

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात