सोनिया गांधी म्हणाल्या आम्ही तिघेही राजीनामा देण्यास तयार, कॉंग्रेस घेणार चिंतन करून निर्णय


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : पक्षाला वाटले तर आम्ही तिघेही राजीनामा द्यायला तयार आहोत, असे कॉँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी म्हटले आहे. मात्र, चिंतन शिबिरात पराभवावर चर्चा झाल्यावरच याबाबत निर्णय होणार असल्याचे पक्षाकडून ठरविण्यात आले.Sonia Gandhi said that all three of us are ready to resign, the Congress will take a decision in Chintan Shibir

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या पराभवाची कारणे आणि भविष्यातील कृतीबाबत रविवारी काँग्रेस कार्यकारिणी चर्चा झाली. या बैठकीत काँग्रेस पक्षाच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आपल्या भाषणात सांगितले की, पक्षाला वाटले तर आम्ही तिघेही राजीनामा द्यायला तयार आहोत.



मात्र काँग्रेस नेत्यांनी त्यास नकार दिला आहे. सोनिया गांधी यांनी स्वत:शिवाय राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांचा उल्लेख केला. आपण तिघेही राजीनामा देण्यास तयार आहोत, असे सोनिया गांधी म्हणाल्या. याला दुजोरा देताना काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी म्हणाले की, बैठकीत राहुल गांधी आणि प्रियंका गांधी वड्रा यांच्या कुटुंबीयांसह मी पक्षातील आपले पद सोडण्यास तयार असल्याचे काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी म्हणाल्या, परंतु आम्ही ते नाकारले.

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखालील काँग्रेसची सर्वोच्च धोरण ठरवणारी संस्था सीडब्ल्यूसीची बैठक पक्षाच्या मुख्यालयात चार तासांहून अधिक काळ चालली. सोनिया गांधींशिवाय, पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी, सरचिटणीस प्रियांका गांधी वढेरा, ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि इतर अनेक नेते या बैठकीला उपस्थित होते.

यामध्ये जी२३ गटाचे नेते गुलाम नबी आझाद, आनंद शर्मा आणि मुकुल वासनिक यांनीही सहभाग घेतला. या बैठकीला माजी पंतप्रधान मनमोहन सिंग उपस्थित नव्हते. कोविड १९ ची लागण झाल्यामुळे ज्येष्ठ नेते ए के अँटनी बैठकीला उपस्थित राहू शकले नाहीत.

पाच राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत दारूण पराभव होऊनही काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वात कोणताही बदल झालेला नाही. रविवारी झालेल्या काँग्रेस कार्यकारिणीत पक्षाची जबाबदारी सोनिया गांधी यांच्या हातात देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बैठकीनंतर मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले की, पक्षाचे नेतृत्व सोनिया गांधी यांच्या हातात असेल. मात्र, सोनिया गांधी यांनी पक्ष मजबूत करण्यासाठी आवश्यक बदल करण्याचे मान्य केले आहे.

काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी पक्षाच्या कार्यकारिणीच्या बैठकीनंतर सांगितले की, काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी काँग्रेसचे नेतृत्व करतील आणि भविष्यातही असाच निर्णय घेतील. आपल्या सर्वांचा त्याच्या नेतृत्वावर विश्वास आहे. एआयसीसीचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल म्हणाले की, सीडब्ल्यूसीने काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या नेतृत्वावर एकमताने विश्वास व्यक्त केला आहे.

सोनिया गांधी यांनी बैठकीत सर्व नेत्यांचे म्हणणे ऐकून घेतले. त्यानंतर पक्ष मजबूत करण्यासाठी आवश्यक ते बदल करण्यास तयार असल्याचे त्यांनी सांगितले. लवकरच चिंतन शिबिर आयोजित करण्यात येणार असून त्यामध्ये पुढील रणनीती आखली जाईल, असा निर्णय बैठकीत घेण्यात आला.

Sonia Gandhi said that all three of us are ready to resign, the Congress will take a decision in Chintan Shibir

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात