राशन- प्रशासन-सुशासन, पुरुषांपेक्षा १६ टक्के जादा महिलांनी दिली भाजपाची साथ


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशात जात किंवा धर्माच्या नावावर नव्हे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या राशन-प्रशासन- सुशासनाला मते मिळाली आहेत. उत्तर प्रदेशात १६ टक्के जादा महिलांनी भाजपला मतदान केले आहे.Ration-Administration-Good governance, 16 per cent more women than men supported BJP

एका सर्वेक्षण संस्थेच्यवा सर्व्हेनुसार ४८ टक्के महिलांनी भाजपला मतदान केले आहे. समाजवादी पक्षाला मतदान करणाऱ्या महिलांची संख्या केवळ ३२ टक्के आहे. जाट समाज यावेळी भाजपच्या विरोधात आहे, असे म्हटले जात होते. मात्र, जाट समाजातील महिलांनीही भाजपला जादा मतदान केले आहे.



५४ टक्के महिलांनी भाजपला मतदान केले आहे. समाजवादी पक्ष आणि राष्ट्रीय लोकदल युतीला केवळ ४६ टक्के जाट महिलांनी मतदान केले आहे. ऐवढेच नव्हे तर यादव, मुस्लिम समाजातील महिलांनीही भाजपला मतदान केले आहे.

महिलांनी भाजपला मतदान करण्याचे कारण म्हणजे कोरोनाच्या कठीण काळात मोदी-योगी सरकारने गोरगरीबांना मोफत रेशन पुरविले. त्याचबरोबर योगी आदित्यनाथ यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात कायदा आणि सुव्यवस्थेत सुधारणा झाली. महिला सायंकाळी सहा नंतर घराबाहेर पडू शकत नव्हत्या.

मात्र, योगी आदित्यनाथ यांनी गुंडांचा बंदोबस्त केला. त्याचबरोबर महिलांसाठी उज्वला गॅस योजनाही महत्वाची ठरली. मोदी सरकारने सुरू केलेली जनधन योजना, आयुष्यमान भारत योजना यामुळे महिलांचे आयुष्य बदलून गेले.

Ration-Administration-Good governance, 16 per cent more women than men supported BJP

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात