एमआयएम उत्तर प्रदेशात नाही ठरला व्होटकटवा, फार नाही फक्त सहा जागांवर बिघडविला समाजवादी पक्षाचा खेळ


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : असदुद्दीन ओवेसी यांच्या ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एमआयएम) पक्षाला व्होटकटवा म्हटले जाते. उत्तर प्रदेशातही एमआयएमने १०० जागांवर उमेदवार उभे केले होते. मात्र, याठिकाणी एमआयएमची जादू चालली नाही. केवळ सहा जागांवर एमआयएमच्या उमेदवारांमुळे समाजवादी पक्षाचा पराभव झाला.MIM did not become votecutter in Uttar Pradesh, only spoiled the Samajwadi Party’s game in six seats

अनेक ठिकाणी मुस्लीम मतदारांची पहिली पसंदी समाजवादी पक्ष होता. मात्र, एमआयएम उमदेवारांनी केवळ सहा ठिकाणी इतकी मते मिळविली की समाजवादी पक्ष आणि एमआयएम यांच्या मतांची बेरीज भाजपपेक्षा जास्त झाली. त्यामुळे एमआयएम मते खाणारा पक्ष आणि भाजपची बी टीम म्हणून केला जाणारा आरोप उत्तर प्रदेशात चुकीचा ठरत आहे.



उत्तर प्रदेशात विधानसभेच्या 403 जागांपैकी 100 जागांवर ह्यएमआयएमह्णचे उमेदवार उभे होते. यातली काही हिंदू अपवाद वगळता बहुतांश जण मुस्लीम होते. या पक्षाला एक टक्क्यापेक्षाही कमी मते मिळाली आहेत. अजमगढ आणि मुबारकपूर जागा वगळता इतर सर्व ठिकाणी एमआयएम उमेदवारांचे डिपॉझिटही जप्त झाले. बिजनौर, नकुड, फिरोजाबाद, मुरादाबाद, कुर्सी, जौनपूर सारख्या मुस्लीम बहुल भागातही भाजपचे उमेदवार निवडून आले. बिजनौर विधानसभा मतदार संघ मुस्लीम बहुल आहे.

या ठिकाणी भाजपचे मौसम चौधरी विजयी झाले. त्यांना 97165 मते मिळाली. तर समाजवादी पक्षाचे नीरज चौधरी यांना 95720 मते मिळाली. या ठिकाणी एमआयएमचे मुनीर अहमद यांनी 2290 मते मिळवली. येथे समाजवादी पक्षाचा उमेदवार 1445 मतांनी पराभूत झाला. सहारनपूर जिल्ह्यातील नकुड विधानसभा मतदार संघही मुस्लीम बहुल मानला जातो.

येथे भाजपकडून मुकेश चौधरी रिंगणात होते. त्यांना 104114 मते मिळाली. समाजवादी पक्षाचे धर्म सिंह सैनि यांना 103799 मते मिळाली. एमआयएम उमेदवार रिजवाना यांना 3593 मते मिळाली. येथे समाजवादी पक्षाचा उमेदवार फक्त 315 मतांनी पराभूत झाला हे विशेष. बाराबंकी जिल्ह्यातील कुर्सी विधानसभा मतदार संघातही असेच झाले.

या ठिकाणी भाजपचे सकेंद्र प्रताप यांना 118720 मते मिळाली. समाजवादी पक्षाचे राकेश वर्मा यांना 118503 मते मिळाली, तर एमआयएमचे उमेदवार अशरफ खान यांना 8541 मते मिळाली. या ठिकाणी समाजवादी पक्षाच्या उमेदवाराला 217 मतांनी भाजपकडून पराभव स्वीकारावा लागला. जौनपूर जिल्ह्यातील शाहगंज मतदार संघात भाजपने पहिल्यांदा विजय मिळवला.

येथे भाजप युतीतील निषाद पक्षाचे उमेदवार रमेश सिंह यांना 86980 मते मिळाली. तर समाजवादी पक्षाच्या आघाडीचे शैलेंद्र यादव ललई यांना 86514 मते मिळाली. ह्यएमआयएमह्णचे उमेदवार नयाब अहमद खान यांना 8128 मते मिळाली. या ठिकाणी समाजवादी पक्षाच्या उमेदवाराला फक्त 468 मतांनी पराभव स्वीकारावा लागला.

अवध भागातील सुलतानपूर विधानसभा मतदार संघात भाजप उमेदवार विनोद सिंह यांना 92715 मते मिळाली. समाजवादी पक्षाचे उमेदवार अनुप सांडा यांना 91706 मते मिळाली. येथे एमआयएमचे मिर्जा अकरम बेग यांना 5251 मते मिळाली. या जागी भाजपने समाजवादी पक्षाच्या उमेदवाराचा 1009 मतांनी पराभव केला.

औराई विधानसभा मतदार संघात भाजप आणि समजावादी पक्षामध्ये काटे की टक्कर झाली. येथे भाजप उमेदवार दीनानाथ भास्कर यांना 93691 मते मिळाली. समाजवादी पक्षाचे उमेदवार अंजनी यांना 92044 मते मिळाली. तर एमआयएमच्या टेडाई यांना 2190 मते मिळाली. येथे भाजप उमेदवाराने समाजवादी पक्षाच्या उमेदवारावर फक्त 1647 मतांनी विजय मिळवला आहे.

MIM did not become votecutter in Uttar Pradesh, only spoiled the Samajwadi Party’s game in six seats

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात