Goa Assembly Election Result 2022: बंगालच्या वाघिणीचा तृणमूल पक्ष भाजपच्या लाटेत गोव्याच्या समुद्रात गेला वाहून; अवघ्या ४ जागांवर आघाडी

वृत्तसंस्था

पणजी : पश्चिम बांगाल प्रमाणे गोव्यातही विजयाचे झेंडे गाडण्याचे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे स्वप्न धुळीस मिळाले आहे. गोवा विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीत बंगालच्या वाघिणीचा तृणमूल पक्ष भाजपच्या लाटेत वाहून गेला आहे. कल पाहता पक्षाने केवळ ४ जागांवर आघाडी घेतली आहे. The Trinamool Party of Bengal’s Tigress in goa sea; BJP wave again in Goa;Trinamool Party Leading only 4 seats

तृणमूल काँग्रेसने गोव्यात पाय रोवून एक वर्षाहून कमी काळ लोटला आहे. असे असूनही, तृणमूलने गोवा विधानसभा निवडणूक एमजीपीसोबत युती करून लढवली आणि सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये४ जागांवर आघाडीवर होते .ममता बॅनर्जी आणि यांचे पुतणे अभिषेक बॅनर्जी सध्या गोव्यात असून गोव्यातील निवडणूक निकालांवर लक्ष ठेवून आहेत. मात्र आता त्यांच्या हातून सगळ्या जागा निसटतांना दिसत आहे.

पश्चिम बंगालमध्ये २०२१ च्या विधानसभा निवडणुकीत मोठ्या विजयानंतर ममता बॅनर्जी यांनी यावेळी तृणमूलच्या ‘टार्गेट दिल्ली’ची घोषणा केली. खासदार अभिषेक बंदोपाध्याय यांना पक्षाचे अखिल भारतीय सरचिटणीस बनवून बंगालबाहेर संघटनेचा विस्तार करण्याची जबाबदारी दिली. यासाठी अभिषेक बॅनर्जी यांनी गोव्यात प्रसार करण्याचा प्रयत्न केला. ममता-अभिषेक यांनी काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री लुईझीन फालेरो फालेरो यांना अखिल भारतीय तृणमूल काँग्रेसचे उपाध्यक्ष तसेच राज्यसभेचे सदस्य बनवले होते.

The Trinamool Party of Bengal’s Tigress in goa sea; BJP wave again in Goa;Trinamool Party Leading only 4 seats

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात