विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : पंजाबमध्ये 5 जानेवारी 2022 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेत झालेल्या मोठ्या त्रुटीमुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. सध्या सोशल मीडियावर एक अॅनिमेटेड व्हिडिओ व्हायरल होत आहे. योगायोग असो वा षड्यंत्र, पंजाबमध्ये जे काही घडले ते या व्हिडिओमध्ये दिसत आहे.
खलिस्तानवाद्यांनी बनवलेला हा अॅनिमेटेड व्हिडिओ जवळपास एक वर्ष जुना आहे. यामध्ये शेतकऱ्यांनी उड्डाणपुलावर पंतप्रधानांना घेराव घालून खाली फेकल्याचे दाखवले आहे.
YouTube पर एक साल पहले ये एनिमेटेड वीडियो खालिस्तानियों द्वारा डाला गया इसमें मोदी जी को फ्लाईओवर के ऊपर नकली किसानों द्वारा रोककर, घेरकर मारने की कोशिश की जाती हैं जैसा इस वीडियो में हैं, हूबहू वैसे ही पंजाब में करने की कोशिश की गई This is serioushttps://t.co/MmY89xUxtl — Kapil Mishra (Modi Ka Pariwar) (@KapilMishra_IND) January 7, 2022
YouTube पर एक साल पहले ये एनिमेटेड वीडियो खालिस्तानियों द्वारा डाला गया
इसमें मोदी जी को फ्लाईओवर के ऊपर नकली किसानों द्वारा रोककर, घेरकर मारने की कोशिश की जाती हैं
जैसा इस वीडियो में हैं, हूबहू वैसे ही पंजाब में करने की कोशिश की गई
This is serioushttps://t.co/MmY89xUxtl
— Kapil Mishra (Modi Ka Pariwar) (@KapilMishra_IND) January 7, 2022
पंजाबमधील घटनेनंतर शीख फॉर जस्टिस (SFJ) या दहशतवादी संघटनेने ही ‘खलिस्तान आझादी’ची सुरुवात असल्याचे म्हटले आहे. हा व्हिडिओ 1 डिसेंबर 2020 रोजी खलिस्तानी संघटनेने DHAKKA GAMING या YouTube चॅनलवर अपलोड केला आहे.
या व्हिडीओमध्ये पीएम मोदी फ्लायओव्हरवर एका बाजूने सुरक्षा कर्मचार्यांसह कारमध्ये येताना दिसत आहेत आणि दुसऱ्या बाजूने शेतकऱ्यांचा ताफा. हे शेतकरी ट्रॅक्टरवर बसून येतात आणि पंतप्रधान मोदींचा रस्ता अडवतात.
एका अॅनिमेटेड व्हिडिओमध्ये पंतप्रधान मोदी कारमधून खाली उतरताना दिसत आहेत. ट्रॅक्टरवर स्वार झालेला आंदोलक त्यांचा मार्ग अडवतो तेव्हा सर्व आंदोलक जमतात आणि त्यांच्याकडे धावतात, या भीतीने पीएम पळू लागतात. मग ते पलीकडे धावतात, पण इथेही एक ट्रॅक्टर त्यांचा रस्ता अडवतो. आणि त्यांना आंदोलक घेरतात. ते लोक लाठ्या-काठ्या घेऊन सज्ज असतात.
हा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ खलिस्तानवाद्यांनी वर्षभरापूर्वी शेअर केला होता. यामध्ये पीएम मोदींसोबत पंजाबमधील सुरक्षेतील त्रुटीसारखीच घटना दाखवण्यात आली आहे.
व्हिडिओमध्ये 1.13 मिनिटांच्या सुमारास जेव्हा पंतप्रधान मोदींचा ताफा एका उड्डाणपुलाजवळ येतो तेव्हा शेकडो नागरी वाहने आणि हजारो लोक त्यांच्या ताफ्याची वाट पाहत असतात.
दरम्यान, 1.30 मिनिटांनी, पंतप्रधान नरेंद्र मोदींचे अॅनिमेटेड पात्र त्यांच्या कारमधून बाहेर पडते आणि गर्दीच्या दिशेने चालत जाते, परंतु संतप्त जमाव पीएम मोदींच्या दिशेने तुफान धावू लागतो. जमाव आपल्याकडे येताना पाहून घाबरलेले सुरक्षा कर्मचारी विरुद्ध दिशेने पळून जातात. पीएम मोदी देखील संतप्त जमावापासून दूर जाण्यासाठी आरडाओरडा करतात.
या ट्रॅक्टरवर ‘किसान एकता जिंदाबाद’ असे लिहिले आहे. शेतकरी जेव्हा बॅरिकेड्स तोडतात तेव्हा पंतप्रधान मोदी घाबरून पळताना दाखवले जातात.ते पुढे धावत आहेत आणि आंदोलक त्याच्या मागे आहेत. दरम्यान, एक ट्रॅक्टर त्यांचा मार्ग अडवतो आणि नंतर आंदोलक त्यांच्या पायाला दोरी बांधून उड्डाणपुलाखाली लटकवतात.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App