दहा एकर जमिनीवर एक हजार झाडे लावली जाणार आहेत. तेथे पशुपक्षी निर्धास्तपणे फिरू शकतील. A memorial will be erected on the antelope hunted by Salman Khan
विशेष प्रतिनिधी
जोधपूर : जोधपूरपासून २० किलोमीटर अंतरावर कनकानी गावात १९९८ मध्ये ‘हम साथ-साथ है’ या चित्रपटाच्या चित्रीकरणावेळी एका काळविटाची शिकार केल्याचा सलमान खानवर आरोप होता.हा आरोप तेथील परिसरात राहणाऱ्या बिष्णोई समाजाने केला होता.त्याचा खटला अद्याप सुरू आहे.
दरम्यान आता या काळविटाचे ज्या जागेवर काळविटाचे दफन केले होते, त्याच ठिकाणी स्मारक उभारण्यात येणार आहे. विशेष म्हणजे त्या काळविटाच्या स्मरणार्थ आठ ते दहा एकर जमिनीवर वन व पशुपक्ष्यांसाठी संरक्षित क्षेत्र तयार करण्याचा निर्णय बिष्णोई समाजाने घेतला आहे.देगणी जमवून या सर्व कामाला प्रारंभ झाला आहे.
याशिवाय दहा एकर जमिनीवर एक हजार झाडे लावली जाणार आहेत. तेथे पशुपक्षी निर्धास्तपणे फिरू शकतील. विशेष म्हणजे या स्मारकाच्या माध्यमातून निसर्गावर प्रेम करण्याचा संदेश देण्यात येणार आहे.यावेळी प्रेम सरन या बिष्णोई समाजातील युवकाने ” प्राणी आमच्या कुटुंबाप्रमाणे आहेत. आमच्या कुटुंबातील एखाद्या सदस्यांच्या बचावासाठी आम्ही आमच्या प्राणांची बाजी लावू शकतो”, अशी प्रतिक्रिया दिली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App