वृत्तसंस्था
अलिबाग : दुचाकी चालविताना हेल्मेट घालावी लागते. मात्र एका एसटी चालकाने चक्क हेल्मेट घालून बस चलविल्याची घटना उघड झाली असून त्याबाबत सोशल मीडियावर चर्चेचा, फोटोचा, व्हिडिओचा धुरळा उडाला आहे. Wearing a helmet while driving bus; unique trick of st bus driver to avoid injury
पगरवाढीच्या घोषणेनंतर काही कर्मचारी संघटना कामावर रूजू झाल्या. परंतु, काही संघटना अजूनही विलीनीकरणावर ठाम आहेत. संपावर ठाम असलेल्या संघटना बसची अडवणूक करत आहेत. काही ठिकाणी दगडफेक झाली. त्यापासून वाचण्यासाठी एका बस चालकाने चक्क हेल्मेट घालून बस चालवली. ही घटना अलिबाग आगारात घडली.
अलिबाग -मुरुड मार्गावर धावणाऱ्या एसटी बस चालकाने सुरक्षेच्या दृष्टीने हेल्मेट घातले होते. या घटनेमुळे कर्मचारी आवक झाले. ही बातमी हा हा म्हणता सोशल मीडियावर व्हायरल देखील झाली.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App