दिल्लीतील वाढत्या प्रदूषणावरून सर्वोच्च न्यायालयाने केंद्रासह दिल्ली सरकारला धरले धारेवर


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली – राजधानी दिल्लीतील वाढत्या प्रदूषणावरून सर्वोच्च न्यायालयाने केंद्र आणि दिल्ली सरकारला चांगलेच धारेवर धरताना पुढील चोवीस तासांमध्ये प्रदूषण नियंत्रणाचे उपाय आमच्यासमोर सादर करा असे निर्देश दिले आहेत.The Supreme Court has taken the Delhi government along with the Center to task over rising pollution in Delhi

न्यायालयाने राज्य सरकारला धारेवर धरताना कर्मचाऱ्यांना घरून काम करण्यास सांगण्यात आले असतानाही लहान मुलांना शाळेमध्ये पाठविण्याचा आग्रह कशासाठी धरला जातो आहे, अशी विचारणा केली.राज्य सरकारनेच सादर केलेल्या शपथपत्रामध्ये शाळा बंद करण्यात आल्याचा दावा केला होता पण प्रत्यक्षात मात्र तसे काही होताना दिसत नाही. तुम्हाला मुलांची चिंता नाही का? असा सवाल न्यायालयाकडून करण्यात आला.

सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांच्या अध्यक्षतेखालील विशेष खंडपीठासमोर याप्रकरणी सुनावणी पार पडली. प्रदूषणाची पातळी कमी करण्यासाठी गंभीर पावले उचलणे गरजेचे असल्याचे न्या. रमणा यांनी म्हटले आहे.‘‘ राजधानीतील प्रदूषण वाढत असताना सरकारकडून मात्र कोणतीही पावले उचलली जात नसल्याचे दिसते.

आम्ही आमचा वेळ वाया घालत आहोत असे आम्हाला वाटते. आता आम्ही तुम्हाला चोवीस तासांचा अवधी देतो आहोत. तुम्हीच गांभीर्याने कृती करत ठोस उपाय आमच्यासमोर सादर करा.’’ असे न्यायालयाने म्हटले आहे.

The Supreme Court has taken the Delhi government along with the Center to task over rising pollution in Delhi

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती