शिखांबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे कांगणाला दिल्ली विधानसभेच्या समितीसमोर ६ डिसेंबरला हजर राहण्याचा आदेश बजावण्यात आला आहे.Kangana Ranaut is here! There will be insulting statements about the Sikh community
विशेष प्रतिनिधी
मुंबई : अभिनेत्री कंगना राणावत नेहमी तिच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत असते.मागील काही दिवसात कांगणाने भारताला १९४७ मध्ये मिळालेले स्वातंत्र्य हे भीक म्हणून मिळाले होते, खरे स्वातंत्र्य तर २०१४ मध्येच मिळाले, अस वक्तव्य केलं होत. या वक्तव्यावरुन अभिनेत्री कंगना राणावत चांगलीच वादात सापडली होती.
यानंतर तिने शिखांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. यामुळे ती आता चांगलीच अडचणीत आली आहे. दरम्यान शिखांबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे कांगणाला दिल्ली विधानसभेच्या समितीसमोर ६ डिसेंबरला हजर राहण्याचा आदेश बजावण्यात आला आहे.यावेळी तिची झाडाझडती घेतली जाणार असल्याचंही समजतं.
कंगणाने केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला कंगनानं ‘खलिस्ताना’ संबोधलं होतं. इतकंच नाही तर तिनं आंदोलक शेतकऱ्यांचा उल्लेख ‘खलिस्तानी दहशतवादी’ असाही केला होता.दरम्यान शिखांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी मुंबईत एक व्यावसायिक आणि दिल्ली शीख गुरुद्वारा व्यवस्थापन समितीनं कंगनाविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. तसेच शिरोमणी अकाली दलानेही कंगनाच्या या वक्तव्यावर आक्षेप घेतला आहे.
तसेच आम आदमी पक्षानं देखील कंगनाच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. आपच्या राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्या प्रीती शर्मा मेनन यांनी याबाबत तक्रार केली आहे. कंगनाने देशद्रोही आणि भावना भडकावणारे वक्तव्य केले आहे. यामुळे तिच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, असे त्यांनी तक्रारीत म्हटलं आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App