केआरके यांनी कंगना राणावत विरोधी केलेले ट्विट होतेय व्हायरल


विशेष प्रतिनिधी

मुबंई : अभिनेत्री कंगना राणावत नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणासाठी चर्चेत असते. कधी ती परखडपणे आणि स्पष्टपणे बोलले म्हणून चर्चेत असते तर कधी खळबळजनक विधाने करते म्हणून. नुकताच तिने शेतकरी कायदे रद्द केल्यामुळे तीक्ष्ण शब्दात आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. याआधीही तिने केलेल्या विधानामुळे संपूर्ण भारत देशामध्ये टीकेची लाट उठली होती.

KRK’s tweet against Kangana Ranaut goes viral

कंगनाच्या या वक्तव्यांवर अभिनेता कमाल आर खान याने आपली प्रतिक्रिया देत कंगनाच्या अटकेची मागणी केली आहे. बॉलीवूड अभिनेता कमाल आर खान देखील त्याच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असतो. नुकताच त्याने ट्विट करत म्हटले आहे की, कंगना ही नेहमीच कापणे, हिंसाचार करणे, उघडपणे मारणे अशा शब्दांमध्ये वक्तव्य होत असते. याविरोधात असा कोणताही कायदा नाहीये का जो कंगनावर लागू होतो? असे कसे? इतर कोणी जर पोस्ट केली असेल तर ते आत्तापर्यंत जेलमध्ये गेले असते. सर्वांना कायदा लागू होत नाही का? असा प्रश्न केआरके यांनी उपस्थित केला आहे. असा प्रश्न करत त्याने मुंबई आणि पंजाब पोलिसांना देखील या पोस्टमध्ये टॅग केले आहे. कंगना विरोधी केलेले हे ट्विट सध्या तुफान व्हायरल होत आहे. बरेच लोक यावर कमेंट करताना देखील दिसून येत आहेत.


‘ हा ‘ बॉलीवूड अभिनेता भारत-पाकिस्तान सामन्याला म्हणाला एक विनोद , जाणून घ्या तो असे का म्हणाला


कंगना आपल्या ट्वीटमधून हेट स्पीच, जातीयवाद, भेदभाव या गोष्टींवर परखडपणे आपली मते व्यक्त करायची. हे ट्विटरच्या पॉलिसीच्या अगेन्स्ट होते. म्हणून तिचे ट्विटर अकाउंट पर्मनंटली बॅन करण्यात आले आहे. तर नुकत्याच तिने केलेल्या वादग्रस्त विधानावरून दिल्ली शीख गुरुद्वारा व्यवस्थापन समितीद्वारे तक्रार दाखल केली आहे. शीख समुदाया विरोधात आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी त्यांनी ही तक्रार दाखल केली आहे.

KRK’s tweet against Kangana Ranaut goes viral

 

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण