WATCH : अमरावतीची बाजारपेठ आठ दिवसांनी उघडली संचारबंदीमध्ये मिळाली शिथिलता

वृत्तसंस्था

अमरावती : अमरावतीमध्ये नुकत्याच झालेल्या हिंसाचारानंतर संपूर्ण शहरांमध्ये संचारबंदीचे आदेश पोलीस आयुक्त आरती सिंह यांनी दिले होते. मात्र आता आठ दिवसानंतर या संचारबंदीमध्ये काही प्रमाणात शिथिलता मिळाली आहे. आज सकाळी ९ ते सायंकाळी ६ पर्यंत संपूर्ण बाजारपेठ उघडण्यासाठी मुभा दिली आहे.Amravati Market Opened eight days later

संपूर्ण शहरातील इंटरनेट सेवा सुद्धा सुरू झाली आहे, हिंसाचारामुळे आठशे ते हजार कोटीचे शहरातील व्यापाऱ्यांचे नुकसान झाले असून आता शहरातील परिस्थिती पूर्ववत येत आहे. सायंकाळी सहा ते दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ वाजेपर्यंत शहरात संचारबंदी कायम राहणार आहे.

– अमरावतीची बाजारपेठ आठ दिवसांनी उघडली

– संचारबंदीमध्ये काही तासांची शिथिलता

– सायंकाळी ६ पर्यंत बाजारपेठ उघडण्यासाठी मुभा

– शहरातील इंटरनेट सेवा सुद्धा सुरू झाली

Amravati Market Opened eight days later