वृत्तसंस्था
कानपूर : उत्तर प्रदेशात येऊन सीएए आणि एनआरसी कायद्याचा मुद्दा उपस्थित करून भडकवणाऱ्या “अब्बाजान” आणि “चाचाजान” नेत्यांना कसे हाताळायचे ते आम्हाला चांगली माहिती आहे, अशा शब्दांमध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी एआयएमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांना फटकारले आहे. We know very well how to deal with the “Abbajan” provocation from the CAA; Yogi’s warning
असदुद्दीन ओवैसी यांनी परवाच बाराबंकी मध्ये येऊन सीएए आणि एनआरसी हे कायदे केंद्र सरकारने मागे घेतले नाहीत, तर उत्तर प्रदेशातल्या शहरा शहरांमध्ये आणि गावा गावांमध्ये शाहीन बागी आंदोलन उभे करू, असा इशारा दिला होता. केंद्र सरकार कृषी कायदे मागे घेऊ शकते तर भारतीय नागरिकत्व सुधारणा कायदा सीएए तसेच एनआरसी का मागे घेऊ शकत नाही? आम्ही त्यासाठी पुन्हा रस्त्यावर उतरून शहरा शहरांमध्ये शाहीन बाग तयार करू, असा इशारा ओवैसी यांनी दिला होता.
या पार्श्वभूमीवर योगी आदित्यनाथ यांनी कानपूरच्या सभेत ओवैसी यांना प्रति इशारा दिला आहे सीएए आणि एनआरसी या मुद्द्यांवरून जनतेला भडकवणारे नेते इथे येतात. त्या “अब्बाजान” आणि “चाचाजान” नेत्यांना मी इशारा देऊ इच्छितो, त्यांना कसे हाताळायचे हे आम्हाला चांगली माहिती आहे. त्यांनी उत्तर प्रदेशात येऊन आम्हाला धमक्या देऊ नयेत, अशा शब्दांमध्ये योगी आदित्यनाथ यांनी ओवैसी यांच्या भाषणाचे वाभाडे काढले आहेत.
ओवैसी आणि योगी या दोन नेत्यांच्या भाषणामुळे उत्तर प्रदेशात सीए आणि एन आर सी या कायद्यांचा मुद्दा निवडणुकीच्या तोंडावर तापत असताना दिसत आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App