सरन्यायाधीश एन. व्ही.रमणा : लोकशाहीतील सर्वच सत्ताधाऱ्यांनी दिनक्रम सुरु करण्यापूर्वी स्वतःच आत्मपरीक्षण करावं


 

रामायण आणि महाभारताचा दाखला देत सत्ताधाऱ्यांना नुकसानकारक असणाऱ्या चौदा अवगुणांचाही या वेळी उल्लेख केला.अस देखील रमणा म्हणले.Chief Justice N. V. Ramana: All those in power in a democracy should introspect themselves before starting their daily routine.


विशेष प्रतिनिधी

पुट्टपार्थी : सोमवारी आंध्र प्रदेशातील पुट्टपार्थी येथील श्री सत्य साई उच्च शिक्षण संस्थेच्या ४०वा पदवीप्रदान सोहळा होता.या सोहळ्या वेळी बोलत होते.यावेळी बोलताना ते म्हणाले की, आपण घेतलेल्या निर्णयांच्या उपयुक्ततेबाबत सत्ताधीशांनी दररोज आत्मपरीक्षण करावयास हवे. तसेच स्वतःतील अवगुणांचाही त्यांनी शोध घ्यायला हवा.रामायण आणि महाभारताचा दाखला देत सत्ताधाऱ्यांना नुकसानकारक असणाऱ्या चौदा अवगुणांचाही या वेळी उल्लेख केला.अस देखील रमणा म्हणले.



पुढे रमणा म्हणाले की, लोकांच्या गरजांनुसार निष्पक्षपणे व्यवस्था सरकारने करायला हवी. लोकशाहीत सर्वसामान्य जनताच सर्वोच्च स्थानी आहे. त्यामुळे सरकारचा प्रत्येक निर्णय जनतेचा फायदा डोळ्यांसमोर ठेवून घेण्यात यावा. खरे शिक्षण म्हणजे नम्रता, शिस्त, निःस्वार्थी वृत्ती, करुणा, सहिष्णुता, क्षमा आणि परस्परांचा आदर या नैतिक मूल्यांची शिकवण देणारे शिक्षण आहे.

मात्र दुर्दैवाने आधुनिक शिक्षण पद्धती केवळ व्यावहारिक ज्ञानावर भर देते. या पद्धतीत नैतिक आणि आध्यात्मिक पैलू दुर्लक्षित राहतात. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणिवा आणि जबाबदारीचे भान येत नाही, असे मत रमणा यांनी व्यक्त केले.

Chief Justice N. V. Ramana: All those in power in a democracy should introspect themselves before starting their daily routine.

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात