ममता बॅनर्जी आज दिल्ली दौऱ्यावर तोफा भाजपवर; पण फोडणार काँग्रेसच; कीर्ति आझाद तृणमूळ काँग्रेसमध्ये येणार

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या आज दिल्लीत दाखल होणार असून त्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. त्यावेळी त्रिपुरा मधील कथित पोलीस अत्याचारांचा मुद्दा उपस्थित करणार आहेत. तसेच ममता बॅनर्जी यांच्या दौऱ्याचा हेतु पंतप्रधानांची भेट तसेच पश्चिम बंगालमध्ये सीमा सुरक्षा दल दलाला दिलेले कथेत जादा अधिकार मागे घेण्याची मागणी हे असले तरी प्रत्यक्षात राजकीय कृती करताना त्या काँग्रेसच फोडताना दिसत आहेत. Mamata Banerjee on a tour of Delhi today, gun on BJP; But the Congress will break; Kirti Azad will join Trinamool Congress

आज त्यांच्या उपस्थितीत भाजपचे माजी खासदार पण सध्या काँग्रेसचे असलेले नेते माजी क्रिकेट कसोटीपटू कीर्ती आझाद यांना त्या तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश देणार आहेत. गोव्यामध्ये ममता बॅनर्जी यांनी आपल्या दौऱ्यात भारताचा टेनिस स्टार लिएंडर पेस तृणमूल काँग्रेस मध्ये सामील करून घेतले. आता 1983 चा वर्ल्डकप मधला क्रिकेटस्टार कीर्ती आझाद यांना त्या आपल्या तब काँग्रेसमध्ये प्रवेश देणार आहेत. भाजपवर तोंडी टीका करत असताना त्या प्रत्यक्षात काँग्रेस फोडण्याची आपली मोहीम यानिमित्त हे पुढे चालू ठेवत असल्याचे चित्र दिसत आहे.तृणमूल काँग्रेसचे खासदार दिल्लीत धरणे आंदोलनाला बसले आहेत. त्रिपुरामध्ये पोलीस अत्याचार करत आहेत. या विरोधी तक्रार करण्यासाठी त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट मागितली होती. ही भेट काल झाली.

पण ममतांच्या या खेळीला भाजपच्या नेत्या खासदार लॉकेट चॅटर्जी यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ममता बॅनर्जी यांना वाटत असेल आपण कुठेही खेळ करू शकतो. पण असे घडणार नाही. त्या म्हणत असतील खेला होबे तर आम्ही म्हणतो विकास होबे…!! सर्व विरोधकांच्या मिळून ममता बॅनर्जी या जर ट्वेंटी 2024 च्या निवडणुकीत पंतप्रधानपदाचा चेहरा असतील तर आमच्याकडे नरेंद्र मोदी यांच्या रूपाने विकासाचा चेहरा आहे, असे लॉकेट लॉकेट चॅटर्जी म्हणाल्यात.

ममता बॅनर्जी या त्रिपुरातील हिंसाचार आणि पोलिसांचे अत्याचार हा मुद्दा पंतप्रधानांच्या भेटीत उपस्थित करणार आहेत. त्याच बरोबर मुंबई, गोवा, लखनऊ या शहरांमध्ये देखील या मुद्द्यावर मी बोलत राहणार आहे, असे ममता बॅनर्जी म्हणाल्या आहेत. भाजपला देशात संघराज्य व्यवस्था उद्ध्वस्त करायची आहे. आपले वर्चस्व लादायचे आहे. राज्यघटनेने राज्यांना दिलेले अधिकार त्यांना मान्य नाहीत, पण आम्ही आमच्या अधिकारांवर पाणी सोडणार नाही, असे वक्तव्य देखील ममता बॅनर्जी यांनी केले आहे.

त्यालाच प्रत्युत्तर देताना खासदार लॉकेट चॅटर्जी यांनी ममता बॅनर्जी यांचा खेला होबे म्हणजे देशात हिंसाचार होणे, कार्यकर्त्यांना मारणे, अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन करणे असा त्यांचा खेळ आहे. पण आम्ही विकासाचा खेळ करू इच्छितो. आम्ही म्हणतो विकास होबे, असे लॉकेट चटर्जी म्हणाल्या आहेरत.

Mamata Banerjee on a tour of Delhi today, gun on BJP; But the Congress will break; Kirti Azad will join Trinamool Congress

महत्त्वाच्या बातम्या