मुख्यमंत्री ममतादिदी पोचल्या दिल्लीत, पंतप्रधान मोदींना भेटणार

विशेष प्रतिनिधी

कोलकता – तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी केंद्राविरुद्ध पुन्हा संघर्ष छेडला आहे. त्या दिल्लीला रवाना झाल्या असून त्रिपुराबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत.
त्रिपुरात आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांवर हल्ले झाल्याचा तृणमूलचा दावा आहे.Mammata didi will meet PM modi in Delhi

त्याच्या निषेधार्थ तृणमूल खासदारांना दिल्लीत धरणे धरले आहे. त्यात आपण कदाचित सहभागी होणार नाही, पण त्यांना नक्कीच पाठिंबा दर्शवू, असेही ममता यांनी सांगितले.त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लब देब आणि त्यांचे सरकार सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांचे उल्लंघन करीत आहे.सामान्य जनतेला त्यांनी उत्तर द्यायला हवे. कायद्यानुसार त्यांच्या सरकारविरुद्ध कारवाई व्हावी म्हणून वरच्या न्यायालयात धाव घेऊ, असे ममता यांनी सांगितले.

Mammata didi will meet PM modi in Delhi

महत्त्वाच्या बातम्या