विशेष प्रतिनिधी
औरंगाबाद : राज्यात एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे बेमुदत आंदोलन सुरु आहे. यामुळे सर्वच ठिकाणची बससेवा ठप्प आहे. अजिंठा लेणीत असलेल्या पर्यावरणपूरक बससेवा ही या आंदोलनामुळे बंद असल्यामुळे पर्यटकांना बैलगाडीने प्रवास करावा लागला.In Ajanta Caves Sarja-Raja , The bullock cart journey started after eighteen years
दरम्यान, ११ रोजी प्रशासनाने खाजगी वाहनांना अजिंठा लेणीमध्ये प्रवेश देण्यात आला आहे. यामुळे तब्बल अठरा वर्षांपासून बंद असलेली लेणीतील खाजगी प्रवासी वाहतूक यानिमित्ताने सुरू झाली आहे.
एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या संपामुळे जगप्रसिद्ध अजिंठा लेणी येथे बैलगाड्याचा प्रवास देशी-विदेशी पर्यटकांना अनुभवायला मिळाला.संपामुळे बंद असलेले एसटी सेवेमुळे सेंटर पर्यंतच्या चार किलोमीटर प्रवासासाठी बैलगाडी चालकांकडून प्रति प्रवासी शंभर रुपये दर आकारला जात होता त्यामुळे पर्यटकांची आर्थिक होती. मात्र या प्रवासाचा अनुभव काहींना नवीनच मिळत होता.
खासगी वाहनांना परवानगी
औरंगाबाद जिल्हा प्रशासनाने ११ रोजी दुपारी तीन वाजता अजिंठा टुरिझम सेंटर पासून अजिंठा लेण्यापर्यंत खाजगी दहा वाहनांना परवानगी दिली आहे या वाहनांमधून प्रवासाच्या काळानुसार आकारले जात आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App