SAMIYA AARZOO :भारतीय असल्याचा मला अभिमान! हसन अलीची पत्नी सामियानं पाकिस्तानींना ठणकावलं ; सुरक्षा नसेल तर भारतात परतणार


  • जर मला व कुटुंबियांना सुरक्षिततेची हमी मिळणार नसेल, तर मी माझ्या माहेरी भारतात निघून जाईल  .

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : वर्ल्ड कपमधील पराभवानंतर पाकिस्तानचा गोलंदाज हसन अली याच्यावर व कुटुंबियांवर टीका होऊ लागली. पाकिस्तानी गोलंदाजाची पत्नी सामिया आरझू ही भारतीय आहे आणि त्यावरूनही तिला रॉ एजंट व पनवती असल्याची टीका झाली. इतकंच नव्हे तर त्यांच्या मुलीलाही बलात्काराची धमकी देण्यात आली.यानंतर सामियाने सोशल मीडियावर पोस्ट करत भारत सरकारला विशेष विनंती केली आहे.SAMIYA AARZOO: I am proud to be Indian! Hassan Ali’s wife Samia slaps Pakistanis; If there is no security, she will return to India

दोन दिवस सोशल मीडियावरील अभद्र ट्रोलिंगनंतर अखेर भारतीय सामियानं पाकिस्तानी चाहत्यांना त्यांची जागा दाखवली.

सोशल मीडियावर सामियानं सडेतोड मत मांडताना ट्रोलर्सना सुनावले. तिनं पंतप्रधान इम्रान खान व पाकिस्तान क्रिकेट बोर्ड ( PCB) यांनाही या वादात लक्ष घालण्याची विनंती केली अन्यथा माहेरी निघून जाईल असेही ठणकावले आहे .

हरयाणात जन्मलेली सामिया मागील अनेक वर्षांपासून दुबईत एअर अमीरातीमध्ये काम करत होती.

तिनं हरयाणा येथील मानव रचना युनिव्हर्सिटीतून बी. टेच ( एरोनॉटीक) ची पदवी घेतली. मागील अनेक वर्षांपासून सामिया दुबईतच स्थायिक झाली आहे. तिचे कुटुंबीय नवी दिल्लीत राहतात.ती पाकिस्तानी क्रिकेटर हसन अलीची पत्नी आहे.

सामियानं ट्विट केलं की

” मी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान आणि पाकिस्तान क्रिकेट मंडळाला आवाहन करू इच्छिते की, त्यांनी पाकिस्तानी फॅन्सकडून आमच्या कुटुंबियांवर होणाऱ्या टीकांवर लक्ष घालावे आणि योग्य ती कारवाई करावी. पाकिस्तानी चाहत्यांचा राग मी समजू शकते, परंतु जय-पराजय हा खेळाचाच भाग आहे.”

अनेक पाकिस्तानी चाहत्यांना असं वाटतं की मी भारतीय एजंट/पनवती आहे, त्याचे मला खूप वाईट वाटते. पाकिस्तानी संघानं संधी गमावली, हार पत्करली याचे हसन अलीची पत्नी म्हणून मलाही वाईट वाटतं. पण, सामन्यानंतर आम्हाला जीवेमारण्याच्या धमक्या मिळू लागल्या.

काही निलाजरे चाहते आमच्या लहान मुलीलाही टार्गेट करत आहेत आणि तिला जीवे मारण्याची धमकी देत आहेत. जर मला व कुटुंबियांना सुरक्षिततेची हमी मिळणार नसेल, तर मी माझ्या माहेरी ( हरयाणा) कुटुंबियांकडे निघून जाईन.

मी डॉ. जयशंकर यांनाही एक भारतीय म्हणून या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती करते.

मी पाकिस्तानच्या लोकांना नम्रपणे आवाहन करते की, मला भारतीय म्हणून अभिमान आहे. मी RAW agent नाही आणि माझा पती हसन अली हा शिया आहे म्हणून त्यानं झेल सोडला, असे तर्क लावू नका. त्यामुळे आम्हाला सुरक्षित वाटूद्या आणि हे सगळं थांबवा.

SAMIYA AARZOO: I am proud to be Indian! Hassan Ali’s wife Samia slaps Pakistanis; If there is no security, she will return to India

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण