एकाच महिन्यात मोडला विश्वविक्रम, महिलेने एकाच वेळी दिला 10 बाळांना जन्म

south african woman reportedly gives birth to record 10 babies at once gosiame thamara sithole world record

south african woman gives birth to 10 babies at once : दक्षिण आफ्रिकेतून एक आश्चर्यकारक घटना समोर आली आहे. येथे एका महिलेने एकाच वेळी 10 मुलांना जन्म देऊन नवीन विश्वविक्रम केला आहे. गेल्या महिन्यात एकाच गर्भावस्थेतून सर्वाधिक मुलांना जन्म देण्याचा विक्रम मोरोक्कोच्या माली येथील हलीमा सिसी नावाच्या महिलेने केला होता. तिने 9 मुलांना जन्म देऊन गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपले नाव नोंदविले. पण आता अवघ्या एका महिन्यातच तिचा विक्रम मोडला गेला आहे. south african woman gives birth to 10 babies at once gosiame thamara sithole world record


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिकेतून एक आश्चर्यकारक घटना समोर आली आहे. येथे एका महिलेने एकाच वेळी 10 मुलांना जन्म देऊन नवीन विश्वविक्रम केला आहे. गेल्या महिन्यात एकाच गर्भावस्थेतून सर्वाधिक मुलांना जन्म देण्याचा विक्रम मोरोक्कोच्या माली येथील हलीमा सिसी नावाच्या महिलेने केला होता. तिने 9 मुलांना जन्म देऊन गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपले नाव नोंदविले. पण आता अवघ्या एका महिन्यातच तिचा विक्रम मोडला गेला आहे.

7 जून रोजी गोसियामी धमारा सिथोल नावाच्या 37 वर्षीय महिलेला 10 मुलांना जन्म देण्यासाठी ऑपरेशन करावे लागले. या महिलेने सात मुले व तीन मुलींना जन्म दिला. गर्भधारणेच्या तपासणीदरम्यान, डॉक्टरांनी तिला 6 मुलांची अपेक्षा असल्याचे सांगितले.

आफ्रिकन माध्यमांनुसार, सिथोलच्या पतीला आठ मुले जन्माची अपेक्षा होती. तपासणीदरम्यान या दोन्ही मुलांबाबत माहिती मिळाली नाही. ते कदाचित दुसर्‍या ट्यूबमध्ये अडकले असावेत असे त्यांनी सांगितले. आपल्या 10 मुलांच्या जन्मामुळे हे जोडपे अत्यंत आनंदी आहेत. कुटुंबात उत्सवाचे वातावरण आहे.

गोसिमी धामरा सिथोलेसाठी एकाच वेळी 10 मुलांना जन्म देणे सोपे नव्हते. ऑपरेशनदरम्यान डॉक्टरांनी खूप काळजीपूर्वक काम केल्याने सर्व मुलांना वाचविण्यात त्यांना यश मिळाले. सिथोलने स्थानिक माध्यमांना म्हटले की, ‘तिला तिच्या गरोदरपण अन् बाळंतपणाबद्दल आश्चर्य वाटतंय.’

सिथोलने म्हटले की, मी खूप आजारी पडले होते. हा खूप कठीण काळ होता. अजूनही खूप कठीण जात आहे. पण आता त्यांना याची सवय झाली आहे. सिथोलने सांगितले की, आता तेवढा त्रास होत नाही परंतु तरीही हे अवघड आहे. मी देवाची प्रार्थना करत होते की, माझ्या सर्व मुलांची सुखरूप प्रसूती व्हावी आणि प्रत्येकजण निरोगी रहावा.

न्यूयॉर्क पोस्टच्या म्हणण्यानुसार, सिथोलची सर्व मुले पूर्णपणे निरोगी आहेत, पुढील काही महिन्यांपर्यंत ते इनक्यूबेटरमध्ये राहतील. सिथोल आणि तिचा पती अत्यंत आनंदी झाले आहेत.

south african woman gives birth to 10 babies at once gosiame thamara sithole world record

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात