congress leader jitin prasad joins bjp in presence of piyush goyal Before Upcoming UP Elections rahul gandhi

जाणून घ्या जितीन प्रसाद यांच्याविषयी, काँग्रेसला राम राम ठोकून भाजपमध्ये का झाले दाखल? यूपीसाठी का महत्त्वाचे? वाचा सविस्तर

Jitin Prasad Joins BJP : ज्योतिरादित्य सिंधियांनंतर कॉंग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्या टीममधून आणखी एक महत्त्वपूर्ण विकेट गेली आहे. कॉंग्रेस नेते व माजी केंद्रीय मंत्री जितीन प्रसाद आज भारतीय जनता पक्षात दाखल झाले आहेत. केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या उपस्थितीत जितीन प्रसाद यांचा भाजप प्रवेश झाला. उत्तर प्रदेश निवडणुकीपूर्वीची ही मोठी राजकीय उलथापालथ आहे. congress leader jitin prasad joins bjp in presence of piyush goyal Before Upcoming UP Elections rahul gandhi


विशेष प्रतिनिधी

लखनऊ : ज्योतिरादित्य सिंधियांनंतर कॉंग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्या टीममधून आणखी एक महत्त्वपूर्ण विकेट गेली आहे. कॉंग्रेस नेते व माजी केंद्रीय मंत्री जितीन प्रसाद आज भारतीय जनता पक्षात दाखल झाले आहेत. केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या उपस्थितीत जितीन प्रसाद यांचा भाजप प्रवेश झाला. उत्तर प्रदेश निवडणुकीपूर्वीची ही मोठी राजकीय उलथापालथ आहे.

जितीन प्रसाद यांचा भाजपमध्ये समावेश झाल्यानंतर केंद्रीय मंत्री पीयूष गोयल म्हणाले की, यूपीच्या राजकारणात जितीन प्रसाद यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. त्याच वेळी जितीन प्रसाद म्हणाले की, मी 7-8 वर्षांत अनुभवले की खर्‍या अर्थाने जर संस्थागत राजकीय पक्ष असेल तर तो भारतीय जनता पक्ष आहे, उर्वरित पक्ष व्यक्तीविशेष व विशिष्ट प्रांतापुरते बनले आहेत.

कॉंग्रेसचा एक मोठा ब्राह्मण चेहरा असलेले जितीन प्रसाद गेल्या अनेक दिवसांपासून पार्टी हायकमांडवर नाराज होते. कॉंग्रेस व यूपी कॉंग्रेसच्या काही नेत्यांकडे लक्ष नसल्याबद्दल त्यांनी नाराजीही व्यक्त केली आहे. जितीन प्रसाद यांच्या तक्रारीकडे काँग्रेसच्या हायकमांडने दुर्लक्ष केले. आजच त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

जितीन प्रसाद का महत्त्वाचे?

पुढच्या वर्षी यूपीमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. यापूर्वी भाजपने आपली सर्व राजकीय समीकरणे निश्चित करण्यास सुरुवात केली आहे. ब्राह्मणांचा एक मोठा वर्ग भाजपवर नाराज असल्याची बातमी आहे. ही नाराजी खासकरून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर आहे. अशा परिस्थितीत भाजपला जितीन प्रसाद यांचा समावेश करून ब्राह्मणांमध्ये मोठा संदेश द्यायचा आहे.

कोण आहेत जितीन प्रसाद?

जितीन प्रसाद हे कॉंग्रेसचे दिग्गज नेते जितेंद्र प्रसाद यांचे सुपुत्र आहेत. जितेंद्र प्रसाद हे दोन पंतप्रधान (राजीव गांधी आणि पीव्ही नरसिंहराव) यांचे राजकीय सल्लागार होते. 2000 मध्ये जितेंद्र प्रसाद यांनी कॉंग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक सोनिया गांधी यांच्या विरोधात लढविली, परंतु त्यांचा पराभव झाला. 2001 मध्ये जितेंद्र प्रसाद यांचे निधन झाले.

यानंतर जितीन प्रसाद यांनी वडील जितेंद्र प्रसाद यांचा राजकीय वारसा ताब्यात घेतला. 2001 मध्ये त्यांनी भारतीय युवा कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. 2004 मध्ये जितीन प्रसाद शाहजहांपूर मतदारसंघातून जिंकून प्रथमच लोकसभेत पोहोचले. यूपीए-१ सरकारमध्ये जितीन प्रसाद यांना केंद्रीय मंत्री करण्यात आले. तेव्हा मंत्र्यांमधून ते सर्वात तरुण चेहरा होते.

2009 मध्ये जितीन प्रसाद यांनी धौरहरा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविली आणि जिंकले. यूपीए-२ मध्ये पेट्रोलियम आणि रस्ते वाहतूक यासारख्या महत्त्वाच्या मंत्रालयांसाठी जितीन प्रसाद यांना राज्यमंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली होती. 2014ची निवडणूक जितीन प्रसाद पराभूत झाले होते. तेव्हापासून जितीन प्रसाद यांचे पक्षात महत्त्व कमी होत गेले होते.

congress leader jitin prasad joins bjp in presence of piyush goyal Before Upcoming UP Elections rahul gandhi

महत्त्वाच्या बातम्या