Accident! उत्तर प्रदेशमध्ये बस आणि रिक्षाचा भीषण अपघात ;१७ जणांचा मृत्यू ; मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांची तत्काळ मदत जाहीर


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील कानपूर येथे बस आणि रिक्षाच्या झालेल्या अपघातात १७ जणांनी आपले प्राण गमावले आहेत. मंगळवारी रात्री साडेआठ वाजल्याच्या दरम्यान सचेंडी भागात हा अपघात घडला. अपघातात ४ जणं गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर लाला लजपत राय हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत.मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या अपघाताबद्दल दुःख व्यक्त करत मृतांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत जाहीर केली आहे. Accident! 17 killed in Uttar Pradesh bus and rickshaw accident The Chief Minister and the Prime Minister announced immediate help

दोन वाहनांची धडक झाल्यानंतर बस पलटली, ही बस लखनऊ वरुन दिल्लीला जात होती. अशी माहिती IG मोहित अग्रवाल यांनी दिली आहे. या अपघातात जखमी झालेल्यांपैकी अनेक जण हे बिस्कीट कंपनीत काम करणारे कामगार आहेत. सकाळी कामावर जात असताना बससोबत धडक झाल्यानंतर हा अपघात घडला आहे. अपघाताचं नेमकं कारण काय आहे याचा पोलीस तपास करत आहेत.

अपघाताची माहिती मिळताच पोलीस ठाण्याची टीम घटनास्थळी दाखल झाली असून त्यांनी बचावकार्याला सुरुवात केली. यापैकी १० जणांना रुग्णालयात दाखल करण्याआधीच त्यांचा मृत्यू झाला होता. उर्वरित ७ जणांनी उपचारादरम्यान आपले प्राण सोडले. या अपघातात जखमी झालेल्यांची परिस्थितीही गंभीर असल्याचं कळतंय.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या अपघाताबद्दल दुःख व्यक्त करत मृतांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत जाहीर केली आहे.

Accident! 17 killed in Uttar Pradesh bus and rickshaw accident The Chief Minister and the Prime Minister announced immediate help

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात