केरळच्या मुख्यमंत्र्यांचा एक महाल बने न्यारा, शासकीय निवासस्थानाच्या नुतनीकरणासाठी करणार एक कोटी रुपये खर्च

राज्य आर्थिक संकटात असताना केरळचे मुख्यमंत्री पिनरायी विजयन यांनी आपला महाल बने न्यारा असे म्हणत नुतनीकरणासाठी एक कोटी रुपये खर्च करण्याचे नियोजन केले आहे. आर्थिक ओढाताण असताना मुख्यमंत्र्यांकडून केलेल्या जात असलेल्या खर्चावर कॉँग्रेसने आक्षेप घेत टीका केली आहे.Kerala Chief Minister, will spend Rs 1 crore to renovate the government residence


विशेष प्रतिनिधी

तिरुअनंतपूरम : राज्य आर्थिक संकटात असताना केरळचे मुख्यमंत्री पिनरायी विजयन यांनी आपला महाल बने न्यारा असे म्हणत नुतनीकरणासाठी एक कोटी रुपये खर्च करण्याचे नियोजन केले आहे. आर्थिक ओढाताण असताना मुख्यमंत्र्यांकडून केलेल्या जात असलेल्या खर्चावर कॉँग्रेसने आक्षेप घेत टीका केली आहे.

कॉँग्रेसचे पी. टी. थॉमस यांनी विधानसभेत हा मुद्दा उपस्थित केला. एका बाजुला केरळमधील विजयन सरकार आर्थिक शिस्त आणावी लागेल आणि कडक निर्णय घ्यावे लागतील असे म्हणत आहे. दुसºया बाजुला मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाचे नुतनीकरण करण्यासाठी तब्बल एक कोटी रुपये खर्च करत आहे. हे धोरण तरी काय आहे, हे समजावून सांगण्याची मागणी थॉमस यांनी केली आहे.थॉमस म्हणाले विधानसभेत अर्थमंत्र्यांनी आश्वासन दिले आहे की आर्थिक शिस्त पाळली जाईल. त्यासाठी कडक आर्थिक निर्णय घेतले जातील. मग नुतनीकरणासाठी एक कोटी रुपये खर्च करण्याचे कारण काय? केरळचे अर्थमंत्री के. एन. बालागोपाल यांनी हे आरोप फेटाळले असून सरकार खर्च कमी करण्यासाठी आवश्यक असलेले सगळे उपाय राबवित असल्याचे म्हटले आहे.

मात्र, मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान ही हेरीटेज बिल्डींग आहे त्यामुळे सरकारच्या अखत्यारीत असलेल्या या इमारतीची दुरुस्ती आणि नुतनीकरण करून हा ठेवा जपायला हवा, असेही अर्थमंत्र्यांनी म्हटले आहे. केरळमध्ये १०० ते १२० वर्षे जुन्या अनेक इमारती आहेत. त्यांचे जतन करून ठेवणे गरजेचे आहे. मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेली क्लिफ हाऊस ही त्यातीलच एक इमारत आहे.

विशेष म्हणजे केरळ सरकारने मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाच्या नुतनीकरणासाठी ९० लाख रुपयांचा खर्च करण्यास मंजुरी दिली आहे. उत्तर केरळातील एका लेबर सोसायटीला हे काम दिले असून त्यासाठी कोणतीही टेंडर प्रक्रिया राबविली गेलेली नाही.

क्लिफ हाऊस हा एक महालच असून त्याची उभारणी ७९ वर्षांपूर्वी झाली आहे. शहराच्या मध्यभागी असलेले क्लिफ हाऊस राजेशाहीच्या काळात दिवाण पेशकरांचे निवासस्थान होते. १९५७ साली केरळची निर्मिती झाल्यापासून बहुतांश मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान राहिले आहे.

Kerala Chief Minister, will spend Rs 1 crore to renovate the government residence

महत्त्वाच्या बातम्या