चार मुस्लीमांच्या अपघाती मृत्यूनंतर कॅनडात चर्चा ‘इस्लामोफोबिया’ची

एका राष्ट्रवादी जहाल फ्रेंच नागरिकाने फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या श्रीमुखात भडकावल्याची घटना नुकतीच घडली. फ्रान्स सरकार मुस्लीमांचे लांगुलचालन करत असल्याने फ्रान्सच्या राष्ट्रीयत्वाला धोका निर्माण झाल्याचे या नागरिकाचे म्हणणे होते. याचा पद्धतीने अन्य पाश्चिमात्य देशांमध्येही मुस्लीम विरोध वाढत असल्याच्या घटना वारंवार समोर येत आहेत. कॅनडामध्ये एका अपघातात पाच मुस्लीमांना ट्रकने चिरडल्याची घटना घडली. मात्र हा अपघात नसून मुस्लीम द्वेषातून केलेला दहशतवादी हल्ला असल्याचे आता सांगितले जात आहे. 20-year-old Canadian national rammed five members of a Muslim family, Canadian Prime Minister Justin Trudeau vowed to use every tool to combat Islamophobia in the country.


वृत्तसंस्था

ओटावा (कॅनडा) : रविवारी (ता. 6) एका वीस वर्षीय कॅनेडीयन तरुणाच्या ट्रकखाली चिरडून एकाच मुस्लीम कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला. तर एक गंभीर जखमी झाला. मात्र हा अपघात नसून दहशतवादी हल्ला असल्याचे कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो यांनीच म्हटले आहे.

हे पाचही मुस्लीम रस्ता ओलांडण्यासाठी त्यांच्या काळ्या रंगाच्या पिक-अप ट्रकमधून रस्त्याच्या कडेला थांबले होते. त्यावेळी भरधाव आलेल्या दुसऱ्या ट्रकने त्यांना चिरडले. अपघात इतका भीषण होता की त्यात चार जणांचा जागीच मृत्यू झाला. मात्र हा अपघात नसल्याचे आता सांगितले जात आहे.कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो म्हणाले, “मुस्लीम द्वेषातून केलेला हा दहशतवादी हल्ला आहे.” या अपघाताचा तपास करणाऱ्या यंत्रणेने सांगितले की हा आंतरराष्ट्रीय कटाचा भाग आहे. मुस्लीम धर्मीय असल्यानेच त्यांना चिरडण्यात आले.

पोलिसांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की पुराव्यावरुन स्पष्ट होते की हा आत्यंतिक द्वेषातून, कट आखून केलेला पूर्वनियोजित हल्ला आहे. हल्लेखोर आणि बळी पडलेल्यांमध्ये कोणताही पूर्वीचा संबंध असल्याचे आढळलेले नाही.

संबंधित वीस वर्षीय ट्रकचालक तरुणावर खुनाचा प्रयत्न, खून असे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सलमान अफजल (वय 46), त्याची पत्नी मदिना सलमान (वय 44), त्यांची पंधरा वर्षीय मुलगी युमनाह अफझल आणि अफजल यांची 74 वर्षीय आईचा अपघातात चिरडून ठार झालेल्यांमध्ये समावेश आहे. अफझल यांचा नऊ वर्षांचा मुलगा रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे.

पंतप्रधान ट्रुडो यांनी मंगळवारी या अपघाताला ‘दहशतवादी हल्ला’ असे म्हटले. एका अपघाताच्या घटनेला स्वतः पंतप्रधानांनीच दहशतवादी ठरवल्यानंतर त्याचे गांभीर्य वाढले आहे. ट्रुडो म्हणाले की पाच मुस्लिमांना चिरडण्याची घटना हा भ्याड हल्ला होता.

अपघातात ठार झालेल्या मुस्लीम कुटुंबियांच्या नातेवाईकांनीही मंगळवारी (ता. 8) निवेदन प्रसिद्धीस दिले. त्यात त्यांनी कॅनडातील वाढत्या ‘इस्लामोफोबिया’ विरोधात ठामपणे उभे राहण्याचे आवाहन सर्वांना केले. या निवेदनात म्हटले आहे, “ज्या तरुणाने हा दहशतवादी हल्ला घडवला तो कोणत्या तरी गटाच्या प्रभावाखाली होता.

या विरोधात सर्वांनी एकत्र आले पाहिजे. तसेच त्यांच्या विरोधात कठोर पाऊल उचलले पाहिजे.” द्वेष आणि इस्लामद्वेष्ट्या भावनेच्या विरोधात आपण एकत्र यायला हवे. या बद्दल राजकीय क्षेत्रात आणि समाजात जागरुकता आणली पाहिजे, असे या निवेदनात पुढे म्हटले आहे.

त्याआधी पंतप्रधान ट्रुडो यांनीही कॅनडातून इस्लामद्वेश घालवण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न करणार असल्याचे स्पष्ट केले. ट्वीटरवरुन संदेश देताना ते म्हणाले की, आपल्या समाजात इस्लामद्वेषाला स्थान नाही. समाजातून ही द्वेषभावना संपली पाहिजे.

20-year-old Canadian national rammed five members of a Muslim family, Canadian Prime Minister Justin Trudeau vowed to use every tool to combat Islamophobia in the country.

महत्त्वाच्या बातम्या