आयकर विभागाची वेबसाईट क्रॅश, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी इन्फोसिसच्या नंदन निलकेनींना झापले


आयकर विभागाची नवीन वेबसाईट क्रॅश झाल्याने संतप्त होऊन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी इन्फोसिस कंपनीचे सहसंचालक नंदन निलकेनी यांना चांगलेच झापले. करदात्यांना कोणत्याही प्रकारची असुविधा होऊ नये असे त्यांनी स्पष्ट केले.Income tax department website crashes, Union Finance Minister Nirmala Sitharaman slams Nandan Nilkeni of Infosys


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : आयकर विभागाची नवीन वेबसाईट क्रॅश झाल्याने संतप्त होऊन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी इन्फोसिस कंपनीचे सहसंचालक नंदन निलकेनी यांना चांगलेच झापले. करदात्यांना कोणत्याही प्रकारची असुविधा होऊ नये असे त्यांनी स्पष्ट केले.

आयकर विभागाची नवीन वेबसाईट मोठा गाजावाजा करून आणि सहा दिवस सर्व्हर बंद ठेवून सोमवारी रात्री लाँच करण्यात आली. मात्र, करदात्यांनी ही वेबसाईट क्रॅश होत असल्याचे फोटो ट्विटरवर टाकले.



ई-फायलिंग पोर्टल 2.0 सोमवारी रात्री 8.45 मिनिटांनी लाँच करण्यात आले. या नव्या वेबसाईटवर आयकर विभागाने वेगवेगळ्या सुविधा दिल्या आहेत. यामध्ये पॅन नंबर टाकल्यानंतर तुमच्या अकाऊंटला तुमची सारी माहिती आपोआपच लोड होणार आहे.

अशा अनेक सुविधा या वेबसाईटवर देण्यात आल्या आहेत. मात्र, ही वेबसाईटच सुरु होण्यास समस्या येऊ लागल्याने अनेकांनी याचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत तक्रार केली होती.

यावर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी इन्फोसिस आणि नंदन निलेकनींना टॅग करत चांगलेच सुनावले आहे. त्यांनी अशाप्रकारची असुविधा पुन्हा करदात्यांना होता नये, अशी अपेक्षा व्यक्त करून करदात्यांना चांगली सेवा देणे आपली प्राथमिकता असायला हवी, असे त्या म्हणाल्या.

Income tax department website crashes, Union Finance Minister Nirmala Sitharaman slams Nandan Nilkeni of Infosys

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात