मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पीएम मोदींकडे केल्या ‘या’ 12 मागण्या, सकारात्मक प्रतिसादाची व्यक्त केली अपेक्षा

CM Uddhav Thackeray PM Modi Visit, CM Thackeray 12 Demands To PM Modi including Maratha Reservation

CM Thackeray 12 Demands To PM Modi : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार व मंत्री अशोक चव्हाण यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज दिल्लीत भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांकडे लेखी 12 मागण्यांचं निवेदन दिलं. ठाकरे म्हणाले की, पंतप्रधानांनी आमचं म्हणणं सविस्तर ऐकून घेतलं आणि त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. CM Uddhav Thackeray PM Modi Visit, CM Thackeray 12 Demands To PM Modi including Maratha Reservation


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार व मंत्री अशोक चव्हाण यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज दिल्लीत भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांकडे लेखी 12 मागण्यांचं निवेदन दिलं. ठाकरे म्हणाले की, पंतप्रधानांनी आमचं म्हणणं सविस्तर ऐकून घेतलं आणि त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.

पीएम नरेंद्र मोदींच्या भेटीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांनी सविस्तर माहिती दिली आहे. पंतप्रधानांनी सर्व विषय गांभीर्याने ऐकून घेतले. राज्याचे जे विषय मांडले आहेत, त्यांना ते सकारात्मक प्रतिसाद देतील अशी अपेक्षा असल्याचंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

मुख्यमंत्री ठाकरेंनी केल्या या 12 मागण्या

1) मराठा आरक्षणाचा अत्यंत संवेदनशील विषय पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे मांडण्यात आला. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर त्याबद्दल योग्य ती भूमिका घ्यावी अशी विनंती केली.

2) 50 टक्के आरक्षणाची मर्यादा शिथिल करण्याची मागणी करण्यात आली.

3) इतर मागासवर्गीयांचे पंचायत राज निवडणुकीतील राजकीय आरक्षण हा देशपातळीवरचा विषय होऊ शकतो.

4) मागासवर्गीयांचं पदोन्नतीतील आरक्षण हा विषयही पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे मांडण्यात आला.

5) मेट्रो कारशेडसाठी कांजूरमार्गची जागा उपलब्ध करून देण्याचा विषयही मांडण्यात आला.

6) GSTची थकबाकी लवकर मिळण्याची पंतप्रधानांना विनंती.

7) शेतकऱ्यांच्या पीक विम्याबाबत अटी-शर्थीसंबंधी बीड मॉडेलबद्दलही चर्चा

8) बल्क ड्रग पार्क : स्पर्धात्मक निविदेस मंजुरी

9) महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर चक्रीवादळं काही वर्षांपासून येत आहेत. तौक्ते वादळानेही दणका दिला. मदतीचे निकष जुने आहेत, ते बदलण्याची मागणी.

10) चौदाव्या वित्त आयोगातील थकीत निधी मिळण्याबाबत चर्चा

11) मराठी भाषा दिन, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासंबंधी योग्य ती पावलं उचलण्याची मागणी

12) आठ महिन्यांपासून विधान परिषद सदस्यांची नियुक्ती रखडली आहे, त्याबद्दलही पंतप्रधानांना विनंती.

CM Uddhav Thackeray PM Modi Visit, CM Thackeray 12 Demands To PM Modi including Maratha Reservation

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात