वृत्तसंस्था
नवी दिल्ली – राजकीयदृष्ट्या शिवसेना – भाजप आज जरी बरोबर नसले, तरी संबंध तुटलेले नाहीत. आपल्याच पंतप्रधानांना मी व्यक्तिगत भेटलो यात गैर काय केले?, असा सवाल करून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी पत्रकारांना गुगली टाकला. पण त्याने महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या नेत्यांनाही चमकवले. I meet PM narendra modi separately in person, there is nothing wrong with it: Maharashtra CM Thackeray in Delhi
पंतप्रधान नरेंद्र मोदींना उध्दव ठाकरे हे व्यक्तिगत भेटले. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण बैठकीत सहभागी झाले. त्यावर पत्रकारांनी प्रश्न विचारल्यावर उध्दव ठाकरे यांनी वरील उत्तर दिले. ते म्हणाले, की राजकीयदृष्ट्या जरी शिवसेना – भाजप आज दूर झाले असले, तरी आमचे संबंध तुटलेले नाहीत. मी काही पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफांना भेटायला गेलो नव्हतो. आपल्याच पंतप्रधानांना मी व्यक्तिगत भेटलो, यात गैर काही गैर केले नाही.
मुख्यमंत्र्यांनी पत्रकाराच्या एका प्रश्नावर हा टोला लगावला असला, तरी महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांच्या नेत्यांनाही तो लागला. ज्येष्ठ नेते शरद पवारांच्या भेटी गाठींचा सिलसिला सध्या सुरू आहे. त्याची मराठी माध्यमे जोरदार चर्चा घडवून आणत आहेत. या पार्श्वभूमीवर अजित पवार आणि अशोक चव्हाण यांच्यासारखे ज्येष्ठ नेते आणि मंत्री बरोबर असूनही उध्दव ठाकरे हे पंतप्रधान नरेंद्र मोदींना वेगळे भेटले. त्यामुळे त्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App