सुवेंदू अधिकारी यांनी घेतली अमित शहांची भेट, तृणमुल कॉंग्रेसचे टीकास्त्र


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : पश्चिम बंगालच्या विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि भाजप नेते सुवेंदू अधिकारी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. पश्चिम बंगालमधील राजकीय हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर अधिकारी यांनी गृहमंत्र्यांची भेट घेतली. तृणमुल कॉंग्रेसने मात्र या भेटीवर जोरदार टीका केली आहे. भ्रष्टाचार प्रकरणातून वाचण्यासाठी त्यांनी ही भेट घेतल्याची टीका तृणमुलने केली आहे. Suvendu Adhikari meets Amit Shah



सुवेंदू अधिकारी यांची राज्य विधानसभेचे विरोधी पक्षनेते झाल्यानंतर शहांबरोबरची ही पहिलीच भेट होती. अधिकारी यांनी केंद्रीय मंत्री मनसुख मांडवीय यांचीही भेट घेतली. पश्चिम बंगालमध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत अधिकारी यांनी तृणमूलच्या सर्वेसर्वा आणि राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा नंदिग्राम मतदारसंघातून चुरशीच्या लढतीत पराभव केला होता.

अधिकारी यांनीही यांसंदर्भात ट्विट केले. ‘केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेवून विविध विषयांवर चर्चा केली. त्यांच्याकडून बंगालसाठी मदत मागितली. बंगालच्या पाठीशी सदैव उभा राहण्याचे आश्वासन त्यांनी दिले, असे ट्विट त्यांनी केले.

Suvendu Adhikari meets Amit Shah

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात