Congress Leader Kamal Nath Hospitalized in Gurugram Due to illness

कॉंग्रेस नेते कमलनाथ यांची प्रकृती खालावली, गुरुग्राम येथील रुग्णालयात दाखल

Congress Leader Kamal Nath : मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि कॉंग्रेसचे दिग्गज नेते कमलनाथ यांना गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कमलनाथ यांना ताप आला होता, त्यानंतर बुधवारी सकाळी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. Congress Leader Kamal Nath Hospitalized in Gurugram Due to illness


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि कॉंग्रेसचे दिग्गज नेते कमलनाथ यांना गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कमलनाथ यांना ताप आला होता, त्यानंतर बुधवारी सकाळी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.

कॉंग्रेसचे दिग्गज नेते कमलनाथ यांना मेदांता रुग्णालयाच्या 15व्या मजल्यावर दाखल करण्यात आले आहे, तेथे डॉक्टरांची एक टीम त्यांची काळजी घेत आहे.

यावर्षी फेब्रुवारी महिन्यात कमलनाथ इंदूरच्या रुग्णालयात गेले होते, तेव्हा त्यांच्यासमवेत लिफ्टमध्ये इतर अनेक नेतेही होते. परंतु लिफ्टचे नियंत्रण सुटले आणि ती अचानक 10 फूट खाली गेली. तथापि, सुदैवाने नेत्यांपैकी कोणालाही दुखापत झाली नव्हती.

74 वर्षीय कमलनाथ राजकारणात सातत्याने सक्रिय आहेत आणि कोरोना काळात मध्य प्रदेश आणि केंद्रातील भाजप सरकारवर हल्लाबोल करत आले आहेत.

केंद्रात अनेक मंत्रिपद भूषवणारे कमलनाथ 2018 मध्ये मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री झाले, परंतु कॉंग्रेसमधील बंडखोरीनंतर एका वर्षाच्या आतच कॉंग्रेसचे सरकार पडले. त्यानंतर भाजपचे सरकार राज्यात परत आले.

Congress Leader Kamal Nath Hospitalized in Gurugram Due to illness

महत्त्वाच्या बातम्या