संभ्रम वगैरे काही नाही; मोदी – शाहांच्या पॉवरफुल खेळीने केलाय पवारांचा त्रिशंकू!!


खासदार सुप्रिया सुळे यांच्या पाठोपाठ शरद पवारांनी देखील अजित पवारांना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते म्हणून पवारांनी पॉवरफुल खेळी करत कुठला डाव टाकून महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात खळबळ निर्माण केल्याचा दावा नेहमीप्रमाणे मराठी माध्यमांनी केला आहे. पवारांनी बारामतीत पत्रकार परिषद घेऊन अजित पवारांना “आपले” म्हटले. त्याच बारामतीत अजित पवारांचे जंगी स्वागत झाले.Modi – Shah power game brought sharad pawar to the knees, to accept ajit pawar as NCP leader

31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबर रोजी मुंबईत इंडिया आघाडीची बैठक होत आहे. या पार्श्वभूमीवर पवारांनी नवा राजकीय बॉम्ब टाकून ठाकरे आणि काँग्रेसला संभ्रमात टाकल्याचा दावाही माध्यमे करीत आहेत. वास्तविक यात संभ्रम वगैरे काही नाही, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या पॉवरफुल खेळीतून पवारांचा त्रिशंकू झाल्याचे राजकीय वास्तव आहे. कारण अजित पवारांना “आपलं” म्हणून स्वीकारण्याशिवाय पवारांना पर्याय नाही ही राजकीय परिस्थिती मोदी – शाह यांनी आणून ठेवली आहे.ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांनी पवारांच्या या तथाकथित पावरफुल खेळीलाच एक्स्पोज करून टाकले आहे. पवार कायदेशीर लढाई करू इच्छित नाहीत. त्यांना राष्ट्रवादीच्या कोणत्याच आमदाराला अपात्र ठरू द्यायचे नाही म्हणून पवार अजित पवारांशी उघड पंगा घेत नाहीत, असे स्पष्ट उद्गार उज्ज्वल निकम यांनी काढून पवारांच्या पॉवरफुल खेळीतली हवा काढून घेतली आहे.

याचा अर्थ एकतर अजित पवारांच्या बाजूचे आमदार त्यांच्यापासून दूर जायला तयार नाहीत. सत्तेची वळचण सोडणे अजित पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांना शक्य नाही हे लक्षात आल्यानंतरच शरद पवारांनी एक प्रकारे राजकीय शरणागती पत्करल्याचे हे चिन्ह आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस संघटनेचे राजकीय फरफट

मूळातच राष्ट्रवादीत नुरा कुस्ती होती. अजित पवारांनी शरद पवारांच्या इशाऱ्यानुसार आपल्या सभांमध्ये त्यांचे फोटो वापरायचे नाहीत आणि शरद पवारांनी अजित पवारांना आपल्याच राष्ट्रवादीचे नेते म्हणायचे असला हा प्रकार प्रत्यक्षात राष्ट्रवादी काँग्रेसची संघटना म्हणून राजकीय फरफट करण्यासारखे आहे आणि ही राजकीय फरफट शरद पवार किंवा अजित पवार यांच्या कोणत्याही पॉवरफुल खेळीतून होत नसून, यात मोदी – शाहांची खरी पॉवरफूल खेळी आहे ही वस्तुस्थिती आहे.

कारण मोदी – शाहांनी परवानगी दिली नसती तर अजित पवार मंत्रिमंडळात येऊ शकले नसते. भाजपने दिलेली खाती स्वीकारली नसती आणि सत्तेच्या वळचणीला ते चिकटून राहू शकले नसते. मोदी – शाहांच्या परवानगीने अजित पवार भाजपच्या सत्तेच्या वळचणीला चिटकून राहिले. अजित पवारांबरोबर आलेले सहकारी देखील राष्ट्रवादीच्या राजकीय सवयीप्रमाणे सत्तेपासून बाजूला होणे शक्य नव्हते म्हणूनच पवारांनी अजित पवारांना लोकशाही मार्गाने आपल्याच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मानले आहे.

 बिटवीन द लाइन्स

किंबहुना मोदी – शाहांच्या राजकीय खेळींमध्ये पवार पूर्णपणे गुरफटून “इंडिया” आघाडीला आतून सतत सुरुंग कसा लागत राहील हे पाहत आहेत ही यातली वस्तुस्थिती आहे. पवारांची कोल्हापुरात सभा आहे. तेथे ते अजित पवारांना टार्गेट करणार नाहीत, तर भाजपला टार्गेट करतील असेच बोलले जात आहे. पण हे तोंडी टार्गेट प्रत्यक्षात राजकीय कृतीत “इंडिया” आघाडीला सुरुंग लावणारे असेल, असेच पवारांनी बारामतीत केलेल्या वक्तव्याचे “बिटवीन द लाईन्स” आहे.

Modi – Shah power game brought sharad pawar to the knees, to accept ajit pawar as NCP leader

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात