विशेष प्रतिनिधी
पुणे : डॉक्टर पत्नीच्या डोक्यात हातोडा मारून तिचा खून करून तलाठी असलेला पती गायब झाला आहे. पत्नीच्या विरहानंतर मी एकटा जिवंत राहू शकत नाही. मला क्षमा कर. मित्रानो मला माफ करा.’अस मजकूर लिहिलेली त्याची चिठ्ठी पोलिसांना मिळाली आहे. Husband killed doctor wife by hitting hammer on head
सोमवारी मध्यरात्री मोशीमध्ये हा प्रकार उघडकीस आला.घडली. पत्नी झोपेमध्ये असतानाच आरोपीने तिच्यावर हल्ला केला. हे दोघे मूळ विदर्भातील रहिवासी आहेत.
डॉ. सरला विजयकुमार साळवे (वय ३२) असे खून झालेल्या डॉक्टर पत्नीचे नाव आहे. मूळच्या गोंदिया जिल्ह्यातील असलेल्या सरला या एका शासकीय रुग्णालयात डॉक्टर म्हणून काम करीत होत्या. विजयकुमार भंडारा येथील रहिवासी होता. तो सध्या जुन्नर तहसीलदार कार्यालयाच्या अखत्यारीत तलाठी म्हणून काम करीत होता. दोन वर्षांपूर्वी त्यांचा प्रेमविवाह झाला होता. लग्न झाल्यानंतर काही दिवसातच त्यांच्यामध्ये संशयावरून वाद सुरू झाले. आरोपी विजयकुमारला पत्नीच्या चरित्र्याबाबत संशय होता. त्यावरून अनेकदा त्यांच्यात भांडणे होत होती.
शनिवारी त्यांच्या घरामध्ये कार्यक्रम होता. रात्री सर्वजण झोपल्यानंतर आरोपीने तिच्या डोक्यात हातोड्याने घाव घातले. तसेच चाकूने शरीरावर वार करीत तिचा खून केला. ही घटना सोमवारी उघडकीस आली. याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलिसानी घटनस्थळी जात पंचनामा करून तपासाला सुरुवात केली आहे. घटनास्थळावर पोलिसांना विजयकुमार याने लिहिलेली चिठ्ठी मिळाली असून त्यामध्ये ‘पत्नीच्या विरहानंतर मी एकटा जिवंत राहू शकत नाही. मला क्षमा कर. मित्रानो मला माफ करा.’ अस मजकूर लिहिलेला आहे. पोलोस त्याचा शोध घेत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App