भवानीपूर सोडून नंदिग्रामला येऊन पराभूत व्हायला काय आम्ही निमंत्रण दिले होते??; सुवेंदू अधिकारी यांचा ममतांना टोला


वृत्तसंस्था

कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या भवानीपूर मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे. ही पोटनिवडणूक का घ्यावी लागते आहे?, या मुद्द्यावरून बंगाल विधानसभेचे विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांनी ममता बॅनर्जी यांना जबरदस्त टोला लावला आहे. तुमचा भवानीपुर मतदारसंघ सोडून नंदिग्राम मध्ये यायला काय आम्ही निमंत्रण दिले होते का? कशाला आलात इकडे?? शेवटी जनतेने तुम्हाला पराभूत केलेच ना…??, असा बोचला सवाल सुवेंदू अधिकारी यांनी ममता यांना विचारला आहे.  West Bengal CM to come to Nandigram Now if the party asks me to contest from Bhowanipore

ममता बॅनर्जी यांनी आपला भवानीपूर मतदारसंघ सोडून भाजपमध्ये गेलेल्या सुवेंदू अधिकारी यांना त्यांचा बालेकिल्ला असलेल्या नंदिग्राम मधून आव्हान दिले होते.
संपूर्ण पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसने प्रचंड विजय मिळवूनही खुद्द ममतांना सुवेंदू अधिकारी यांच्याविरोधात पराभूत व्हावे लागले होते. म्हणूनच आता भवानीपूर मतदारसंघाची पोटनिवडणूक घ्यावी लागत आहे.

या पार्श्वभूमीवर सुवेंदू अधिकारी यांनी ममता बॅनर्जी यांना टोला लगावला आहे. आता जर
भाजपने मला भवानीपूर मधून लढायला सांगितले तर तुम्हाला काय वाटेल? तुमचा तिथेपण येऊन आम्ही पराभव करू शकतो, असा इशारा सुवेंदू अधिकारी यांनी दिला आहे.

भवानीपूरमधून तगडा उमेदवार देण्याचे भाजपचे मनसूबे आहेतच. त्यात सुवेंदू अधिकारी यांना निवडणूक लढवायला सांगितली तर ममतांसमोर खऱ्या अर्थाने प्रचंड मोठे आव्हान उभे राहू शकते. एकूण भवानीपूरची पोटनिवडणूक ममतांसाठी अजिबात सोपी ठेवायची नाही हा इरादा भाजपने पक्का केलेला दिसतो आहे.

West Bengal CM to come to Nandigram Now if the party asks me to contest from Bhowanipore

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात