पवार – वळसे यांच्या कार्यक्रमांना गर्दी; मुख्यमंत्र्यांची तंबी; आता राष्ट्रवादीला गर्दी टाळण्याची उपरती


प्रतिनिधी

मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि ठाकरे पवार सरकारमधले गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या कार्यक्रमांना काल जुन्नर, आंबेगावमध्ये राष्ट्रवादीने गर्दी करून घेतली. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा इशारा दिल्याबरोबर राष्ट्रवादीच्या नेत्यांना आता गर्दी टाळण्याची उपरती झाली. इथून पुढे राष्ट्रवादीच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना गर्दीचे कार्यक्रम टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे, असे राष्ट्रवादीचे प्रवक्ते नबाब मलिक यांनी सांगितले आहे.NCP to follow CM Uddhav Thackeray’s suggestions regarding political programs

काल शरद पवार आणि दिलीप वळसे पाटील हे जुन्नर आणि आंबेगावच्या दौऱ्यावर होते. तेथे त्यांचे विविध कार्यक्रम झाले. त्याला राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी भरपूर गर्दी जमवली होती. दोन्ही नेत्यांनी गर्दीचा उल्लेख आप आपल्या भाषणात जाता जाता आणि किरकोळ स्वरूपात केला होता. शरद पवारांनी तर जुन्नरच्या कार्यक्रमात महिला कमी आल्याबद्दल ट्विट देखील केले होते. कार्यक्रमांना महिला अधिक येतील याची काळजी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी घेण्याची सूचना त्यांनी ट्विटमधून केली होती.पण आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र आणि संपूर्ण देश कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या उंबरठ्यावर उभा असल्याचा इशारा देऊन शिवसेनेसह सर्व पक्षांना गर्दीचे कार्यक्रम टाळण्याचा सल्ला दिला. शरद पवार आणि वळसे पाटलांचे कार्यक्रम काल उरकून घेतल्यानंतर आज मुख्यमंत्र्यांचा सल्ला मानण्याचे राष्ट्रवादीने ठरविले. त्यानुसार राष्ट्रवादीच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना कार्यक्रमांमध्ये गर्दी टाळण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनीही माहिती आजच्या पत्रकार परिषदेत दिली आहे.

मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत सर्व सहकारी पक्षाच्या नेत्यांना गर्दी टाळून कार्यक्रम घेण्याचे आवाहन केले आहे. त्यांची सूचना राष्ट्रवादी काँग्रेस पाळणार आहे. त्याबरहुकूम कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना सूचना देण्यात आल्या आहेत, असे नवाब मलिक म्हणाले.

NCP to follow CM Uddhav Thackeray’s suggestions regarding political programs

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण