पोलिसांना लाठ्यांना तेल लावायला सांगणारे गृहमंत्री अटकेला घाबरत आहेत; राम शिंदे यांचा टोला; पण पोलिसांना त्यांचा ठावठिकाणा माहिती


प्रतिनिधी

अहमदनगर : कोरोना लॉकडाऊनच्या काळात सामान्यांची गर्दी पांगविण्यासाठी गृहमंत्री अनिल देशमुख पोलिसांना लाठ्यांना तेल लावून ठेवायला सांगत होते. आता त्यांना त्याच लाठ्यांची भीती वाटत असल्याने ते अटक टाळत असावेत, असा टोला भाजपचे माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांनी लगावला आहे. former minister ram shinde taunts anil deshmukh over lookout notice

पोलिसांना त्यांचा ठावठिकाणा माहिती आहे पण ते ठाकरे पवार सरकारच्या दबावामुळे सांगत नाहीत, असा दावाही राम शिंदे यांनी केला. राम शिंदे यांनी आज नगरमध्ये प्रसारमाध्यामांशी बोलत होते. त्यावेळी त्यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासंबंधी विचारलेल्या प्रश्नावर परखड मत मांडले.राम शिंदे म्हणाले, की केंदीय मंत्र्याला तात्काळ अटक केली जाते. गुन्हा घडला महाडमध्ये, दाखल केला नाशिकमध्ये आणि स्थानबद्ध केले रत्नागिरीत. केंद्रीय मंत्र्याला अशा पद्धतीने अटक केली जाते आणि आता माजी गृहमंत्र्याविरुद्ध लूकआऊटची नोटीस जारी होऊनही माजी गृहमंत्री सापडत नाही, हे पटत नाही. खरे तर त्यांनी स्वत: होऊन तपास यंत्रणेसमोर यायला हवे. पाच नोटिसा जाऊनही ते हजर होत नाहीत. त्यांना कधी ना कधी ईडीपुढे जावेच लागेल. प्रथमच हे पाहण्यात येत आहे की, वकिलाला आणि अधिकाऱ्यालाच अटक झाली आणि आरोपी फरार आहे. त्यामुळे त्यांनी स्वत: हजर झाले पाहिजे. नाहीच झाले तर पोलिसांना माहिती असेल की ते कोठे आहेत,’ असा दावाही शिंदे यांनी केला.

‘करोनाच्या काळात सामान्य लोकांची गर्दी पांगविण्यासाठी याच गृहमंत्र्यांनी पोलिसांना लाठ्यांना तेल लावून ठेवण्यास सांगितले होते. कदाचित आता त्यांना याच लाठ्यांची भीती वाटत असावी. केंद्रीय मंत्र्याला अटक होते आणि माजी गृहमंत्री सापडत नाही, असा या राज्याचा कारभार आहे. त्यामुळे जनतेचा यांच्यावर विश्वास राहिला नाही,’ अशी टीकाही शिंदे यांनी केली.

जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागाचे तातडीने पंचमाने करावेत. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी. या मागणीसाठी शिंदे यांनी भाजपच्या शिष्टमंडळासोबत जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांवरही त्यांनी टीका केली. पालकमंत्री हसन मुश्रीफ जिल्ह्यासाठी कमी वेळ देत असल्याचा आरोप त्यांनी केला. ‘पालकमंत्री कधीही जिल्ह्यातील नागरिकांचा विचार करीत नाहीत. त्यांच्या तक्रारी ऐकून घेत नाहीत. त्यांच्या दु:खात सहभागी होत नाहीत. नुकसान झाल्यावर दिलासा देत नाहीत. विरोधी पक्ष म्हणून आम्ही अनेकदा सांगतो आहोत, पण ऐकून घेत नाहीत. नगर जिल्ह्यात तीन मंत्री आहेत. जर मुश्रीफ यांना नेहमी येथे यायला जमत नसले तर येथील एखाद्या मंत्र्यांकडे हे अधिकार सोपवावेत. इतर मंत्र्यांनी तरी पालकमंत्र्यांची कमी भरून काढावी, अन्यथा आम्हाला आंदोलन करावे लागेल,’ असा इशाराही शिंदे यांनी दिला.

former minister ram shinde taunts anil deshmukh over lookout notice

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण