Farmers Protest : सर्वोच्च न्यायालयाने सिंघू बॉर्डर रिकामी करण्याची याचिका नाकारली, पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयात जाण्याचे निर्देश

Supreme Court Refuses To Hear Plea Singhu Border Blocked By Farmers Protest Asks To Approach Punjab High Court

Farmers Protest : शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे बंद करण्यात आलेली सिंघू सीमा खुली करण्याच्या याचिकेवर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने याचिकाकर्त्याला पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयात जाण्यास सांगितले आहे. Supreme Court Refuses To Hear Plea Singhu Border Blocked By Farmers Protest Asks To Approach Punjab High Court


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे बंद करण्यात आलेली सिंघू सीमा खुली करण्याच्या याचिकेवर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने याचिकाकर्त्याला पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयात जाण्यास सांगितले आहे.

सर्वोच्च न्यायालयात दोन स्थानिक लोकांच्या याचिकेत असे म्हटले होते की, रस्ता कित्येक महिन्यांपासून बंद आहे, त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने सरकारला रस्ता उघडण्याचे निर्देश द्यावेत किंवा दुसरा रस्ता बांधण्याचा आदेश जारी करावा, जेणेकरून लोकांना सहजपणे प्रवास करता येईल.

दुसरीकडे, भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी नुकत्याच मुझफ्फरनगर येथे पार पडलेले किसान महापंचायतमध्ये आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार केला आहे. ते म्हणाले की, जोपर्यंत कायदे मागे घेतले जाणार नाहीत, तोपर्यंत शेतकरी आंदोलन सुरूच राहील.

Supreme Court Refuses To Hear Plea Singhu Border Blocked By Farmers Protest Asks To Approach Punjab High Court

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात