Konkan Expressway : मुंबई ते सिंधुदुर्ग प्रवास अवघ्या ३ तासांत होणार, ७० हजार कोटींचा प्रकल्प ६ वर्षांत पूर्ण होण्याची अपेक्षा

Mumbai-Sindhudurg in 3 hours Maharashtra plans Konkan Expressway, project to cost Rs 70000 crore

Konkan Expressway : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वात सार्वजनिक बांधकाम विभागाने मुंबई आणि सिंधुदुर्गमार्गे रायगड आणि रत्नागिरीला जोडणारा 400 किमीचा महामार्ग बांधण्यासाठी 70,000 कोटी रुपयांच्या महत्त्वाकांक्षी योजनेचा मसुदा तयार केला आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यावर मुंबई ते सिंधुदुर्गचा प्रवास अवघ्या तीन तासांत होईल. याच प्रवासाला सध्या सहा ते सात तास लागतात. Mumbai-Sindhudurg in 3 hours Maharashtra plans Konkan Expressway, project to cost Rs 70000 crore


विशेष प्रतिनिधी

मुंबई : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वात सार्वजनिक बांधकाम विभागाने मुंबई आणि सिंधुदुर्गमार्गे रायगड आणि रत्नागिरीला जोडणारा 400 किमीचा महामार्ग बांधण्यासाठी 70,000 कोटी रुपयांच्या महत्त्वाकांक्षी योजनेचा मसुदा तयार केला आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यावर मुंबई ते सिंधुदुर्गचा प्रवास अवघ्या तीन तासांत होईल. याच प्रवासाला सध्या सहा ते सात तास लागतात.

6 सप्टेंबर रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वेबसाइटवर दिलेल्या आदेशानुसार, सरकारने राज्य रस्ते विकास महामंडळ MSRDC ला मागच्या वर्षी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यास सांगितले होते. 25 ऑगस्ट रोजी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय पायाभूत सुविधा समितीने या प्रस्तावाला मंजुरी दिली. याला कोकण एक्स्प्रेस-वे असं म्हटलं जात आहे.

400 किमीच्या या महामार्गासाठी तब्बल 70 हजार कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. कोकण एक्स्प्रेस-वे तयार झाल्यावर प्रवाशांचा भरपूर वेळ वाचणार आहे. ‘ग्रीन फिल्ड कोकण एक्स्प्रेस वे’ असं या प्रकल्पाचं नाव आहे. या प्रकल्पासाठी 4 हजार हेक्टर जमिनीची गरज आहे. उरणच्या चिर्ले गावातून सुरू होणारा हा प्रकल्प सिंधुदुर्गाच्या पत्रादेवीपर्यंत असणार आहे. तब्बल 400 किमीचा हा मार्ग आहे. सहा वर्षांत हा प्रकल्प पूर्ण करण्याचा मानस आहे. हा मार्ग झाल्यानंतर मुंबई ते सिंधुदुर्गाचा प्रवासाचा अर्धा वेळ वाचणार आहे.

टीओआयला एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, या प्रकल्पाचे नियोजन समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर करण्यात आले आहे. या प्रकल्पामुळे कोकणचा विकास होईल असेही ते म्हणाले. मुंबईही भारताची आर्थिक राजधानी आहे. कोकण मुंबईच्या जवळ असूनही खराब वाहतूक व्यवस्था, महामार्ग यामुळे कोकणाचा तितकासा विकास झालेला नाही, या नव्या महामार्गामुळे कोकणातही नव्या संधी निर्माण होतील, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

ठळक वैशिष्ट्ये

> 400 किमीचा द्रूतगती महामार्ग 6 वर्षांत

> मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर नवा एक्स्प्रेस वे

> मुंबई ते सिंधुदुर्ग ग्रीनफील्ड कोकण एक्स्प्रेस वे रायगड, रत्नागिरीला जोडून

> प्रकल्पाचा अंदाजित खर्च 70,000 कोटी

> 400 किमीच्या महामार्गामुळे सध्याच्या प्रवासाचा वेळ निम्म्यावर येणार

> प्रकल्पाचा सविस्तर अहवाल दोन वर्षांत अपेक्षित, पुढील चार वर्षे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी

> प्रकल्पासाठी 4000 हेक्टर जमिनीची आवश्यकता

Mumbai-Sindhudurg in 3 hours Maharashtra plans Konkan Expressway, project to cost Rs 70000 crore

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात