ममता बॅनर्जींचा ‘खेला’ सुरूच, भाजपला मोठा धक्का देण्याच्या तयारीत? 24 आमदार संपर्कात असल्याचा मुकुल रॉय यांचा दावा


पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपासून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे ‘खेला’ सुरू आहे. निवडणुकीनंतर भाजपचे आमदार सातत्याने टीएमसीमध्ये सामील होत आहेत. टीएमसीचे राष्ट्रीय सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांच्या दाव्यानंतर आता भाजपमधून टीएमसीमध्ये सामील झालेले मुकुल रॉय यांनी दावा केला आहे की, भाजपचे 24 आमदार त्यांच्या संपर्कात आहेत. ईडीच्या चौकशीनंतर अभिषेक बॅनर्जी यांनी दावा केला होता की भाजपचे 25 आमदार त्यांच्या संपर्कात आहेत. Mamata Banerjee khela continues in Bengal, Mukul Roy claims More 24 MLAs are in Contact


विशेष प्रतिनिधी

कोलकाता : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपासून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे ‘खेला’ सुरू आहे. निवडणुकीनंतर भाजपचे आमदार सातत्याने टीएमसीमध्ये सामील होत आहेत. टीएमसीचे राष्ट्रीय सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांच्या दाव्यानंतर आता भाजपमधून टीएमसीमध्ये सामील झालेले मुकुल रॉय यांनी दावा केला आहे की, भाजपचे 24 आमदार त्यांच्या संपर्कात आहेत. ईडीच्या चौकशीनंतर अभिषेक बॅनर्जी यांनी दावा केला होता की भाजपचे 25 आमदार त्यांच्या संपर्कात आहेत.

भाजपचे आमदार सौमेन रॉय टीएमसीमध्ये परतल्यानंतर काही दिवसांनी, आता तृणमूल नेते मुकुल रॉय यांनी दावा केला आहे की, येत्या काळात भाजपचे अनेक आमदार टीएमसीमध्ये सामील होऊ शकतात. ते म्हणाले की, ममता बॅनर्जी यांच्यासोबत काम करू इच्छिणारे 24 आमदार त्यांच्या संपर्कात आहेत. मुकुल रॉय म्हणाले की, टीएमसीमध्ये सामील होऊ इच्छिणाऱ्या आमदार आणि नेत्यांची यादी मोठी आहे.



निवडणुकीनंतर भाजपचे चार आमदार तृणमूलमध्ये गेले

या वर्षी जूनमध्ये मुकुल रॉय स्वतः भाजप सोडून टीएमसीमध्ये परतले. चार वर्षांपूर्वी त्यांनी टीएमसीमधून भाजपमध्ये प्रवेश केला होता. मात्र, विधानसभा निवडणुकीत भाजपचा पराभव झाल्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा ममता बॅनर्जी यांचे नेतृत्व स्वीकारले. गेल्या चार आठवड्यांत सौमेन रॉय, विश्वजित दास आणि तन्मय घोष यांच्यासह भाजपचे चार आमदार टीएमसीमध्ये सामील झाले आहेत. विशेष म्हणजे हे सर्व मुकुल रॉय यांचे जवळचे मानले जातात आणि हे सर्व 2021च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी मुकुल रॉय यांच्यामुळे भाजपमध्ये सामील झाले होते.

भाजपच्या आमदारांची संख्या 71 वर

पार्थ चॅटर्जी यांच्या उपस्थितीत गेल्या आठवड्यात सौमेन रॉय पक्षात सामील झाले होते. यापूर्वी 30 ऑगस्ट रोजी बिष्णुपूरचे आमदार तन्मय घोष टीएमसीमध्ये परतले होते. दुसऱ्याच दिवशी, उत्तर 24 परगणा जिल्ह्यातील बागडा विधानसभा मतदारसंघातील भाजपचे आमदार विश्वजित दास देखील टीएमसीमध्ये सामील झाले. सौमेन रॉय टीएमसीमध्ये सामील झाल्यानंतर, बंगाल विधानसभेत भाजपच्या आमदारांची संख्या 71 वर आली आहे, तर निवडणुकीच्या वेळी आमदारांची संख्या 77 होती.

Mamata Banerjee khela continues in Bengal, Mukul Roy claims More 24 MLAs are in Contact

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात