ईडीच्या चौकशीला सामोरे जायलाच आलोय; ममतांचे भाचे खासदार अभिषेक बॅनर्जी दिल्लीच्या ईडी कार्यालयात हजर


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : पश्चिम बंगालमधील कोळसा घोटाळा प्रकरणात सक्तवसुली संचालनालय ईडीने नोटीस पाठवल्या बरोबर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे भाचे खासदार अभिषेक बॅनर्जी हे ईडीच्या दिल्लीच्या कार्यालयात चौकशी आणि तपासासाठी दाखल झाले असून आपण न घाबरता ईडीच्या कोणत्याही चौकशी आणि तपासाला सामोरे जायला तयार आहोत, असे अभिषेक बॅनर्जी यांनी दिल्लीच्या कार्यालयासमोर पत्रकारांना सांगितले.We are facing an ED inquiry; Mamata’s nephew MP Abhishek Banerjee arrives at the ED office in Delhi

कोळसा घोटाळा किंवा मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात आपला काहीही संबंध नाही. हे मी आधीच स्पष्ट केले आहे. ईडी तपास संस्थांचे अधिकारी चौकशी करण्याचे त्यांचे काम करत आहेत. एक नागरिक म्हणून त्यांना उत्तरे देणे हे माझे कर्तव्य आहे. मी कोणत्याही घोटाळ्यात अडकलेले नाही, असे अभिषेक बॅनर्जी यांनी स्पष्ट केले आहे.एकीकडे खासदार अभिषेक बॅनर्जी हे धीटपणे किडीच्या चौकशीला सामोरे जात आहेत आणि दुसरीकडे महाराष्ट्राचे ठाकरे – पवार सरकार मधील राजीनामा द्यावा लागलेले गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात ईडीला लूकआऊट नोटीस काढावी लागली आहे.

या विषयावर सोशल मीडियात जोरदार चर्चा रंगत असून अनेकांनी बंगाल विरुद्ध महाराष्ट्र अशीही “लढत” लावून दिली आहे. बंगाल दिल्ली समोर जाऊन टक्कर घेतोय आणि महाराष्ट्र नुसत्या दिल्लीपुढे न झुकण्याच्या बाता करतोय, अशी खिल्ली अनेक नेटिझन्सनी सोशल मीडियावर उडविली आहे.

We are facing an ED inquiry; Mamata’s nephew MP Abhishek Banerjee arrives at the ED office in Delhi

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण