वृत्तसंस्था
अमृतसर – पंजाबमध्ये विधानसभेच्या निवडणूका जवळ आलेल्या असताना काँग्रेसमध्ये गटबाजी उफाळून आली आहे, तर अकाली दलाने आक्रमक राजकीय पावले टाकायला सुरूवात केली आहे. BSP & announced a Dalit deputy CM to ensure peace & prosperity of Punjab… The second deputy CM will also be there from the Hindu community
अकाली दलाने पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या विरोधात जोरदार आघाडी उघडली आहेच. त्याच बरोबर social engineering चा प्रयोग राबवून अकाली दलाने मायावतींच्या बहुजन समाज पक्षाबरोबर आघाडी केली आहे. त्यांनी बसपला दलित मुख्यमंत्र्यांचेही आश्वासन दिले आहे.
दलित समाजाच्या बरोबरीने संपूर्ण हिंदू समाजालाही सोबत घेण्यासाठी अकाली दलाच्या नेत्या आणि माजी केंद्रीय मंत्री हरसिमत कौर बादल यांनी पंजाबात हिंदू उपमुख्यमंत्री करण्याची घोषणा केली आहे. म्हणजे अकाली दल – बसप आघाडी विधानसभेची निवडणूक जिंकली, तर अकाली दलाचे अध्यक्ष आणि प्रकाश सिंग बादल यांचे चिरंजीव सुऱबीर सिंग बादल हे मुख्यमंत्री बनतील. तर त्यांच्या बरोबर एक दलित उपमुख्यमंत्री आणि एक हिंदू उपमुख्यमंत्री शपथ घेईल, असे हरसिमरत कौर बादल यांनी स्पष्ट केले.
In the Monsoon session of parliament, SAD president will move an adjournment motion. He has appealed to all parties to come together for a discussion on farmers' issues before discussion on any other subject in the House: SAD leader Harsimrat Kaur — ANI (@ANI) July 15, 2021
In the Monsoon session of parliament, SAD president will move an adjournment motion. He has appealed to all parties to come together for a discussion on farmers' issues before discussion on any other subject in the House: SAD leader Harsimrat Kaur
— ANI (@ANI) July 15, 2021
एकीकडे अकाली दल आणि बसप युतीने मुख्यमंत्री – उपमुख्यमंत्रीपदासाठी social engineering करीत जातीय समतोल साधण्याचा प्रयत्न केला आहे. तर सत्ताधारी काँग्रेसमध्ये अजूनही मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग आणि नवज्योत सिंग सिध्दू यांच्यातील राजकीय वादावर तोडगा निघू शकलेला नाही. अशा गटबाजीच्या गदारोळाच्या स्थितीत काँग्रेस राज्यात निवडणूकीला सामोरी जाण्याचा प्रयत्न करीत आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App