दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांना मनी लॉन्ड्रीग प्रकरणात अटक झाली आणि राहुल गांधींचे सगळे मुसळ केरात गेले!! राहुल गांधी गेले साधारण वर्षभर भारत जोडो न्याय यात्रेत तब्बल 10000 किलोमीटर चालले, पण केजरीवालांना अटक होताच क्षणी सगळ्या विरोधकांनी राहुल गांधी sidetrack वर टाकले आणि आपली सगळी झुंड अटकेत पडलेल्या केजरीवालांभोवती जमवली. काल रात्रीपासून आज सकाळपर्यंतचे हे चित्र होते.As soon as Kejriwal was arrested, the opposition sidetracked Rahul Gandhi; Crowd gathered around Kejriwal!!
वास्तविक आपल्याला अटक होणार हे केजरीवालांना माहिती नव्हते, असे बिलकुल नाही. उलट त्यासाठी त्यांनी स्वतःहून भरपूर “वातावरण निर्मिती” केली. सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडीची तब्बल 9 समन्स त्यांनी वेगवेगळ्या बहाण्यांनी टाळली, की जे एक रेकॉर्ड आहे. प्रत्येक वेळी ईडीने कोर्टात जाऊन केजरीवालांना घेरण्याचा प्रयत्न केला. पण ईडीला सुरुवातीला यश येऊ शकले नाही. केजरीवालांविरुद्ध केवळ किरकोळ मनी लॉन्ड्रीग प्रकरण नाही, तर दिल्ली दारू घोटाळा, त्यानंतर जल बोर्डाचा घोटाळा असे एका पाठोपाठ एक लायनीत घोटाळ्यांचे शुक्लकाष्ट केजरीवालांच्या मागे लागले आहे. त्यामुळे आपल्याला अटक होणार याची केजरीवालांना पक्की माहिती आणि जाणीव होती.
पण ते स्वतःच निवडणुकीच्या ऐन तोंडावर ड्रामा करण्यासाठी ईडीचे समन्स वारंवार टाळत होते. परंतु कायद्याने करायचे ते आपले काम केलेच. केजरीवालांची समन्स टाळण्याची प्रवृत्ती पाहूनच दिल्ली हायकोर्टाने त्यांचे अटक टाळण्याचे सर्व कायदेशीर मार्ग बंद करून टाकले. त्यामुळेच ईडीचे अधिकारी अरविंद केजरीवालांच्या दारापर्यंत जाऊन पोहोचले. ते घरात गेले त्यांनी केजरीवाल्यांची चौकशी केली आणि कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करूनच केजरीवालांना अटक केली.
दरम्यानच्या काळात केजरीवाल सुप्रीम कोर्टापर्यंत पोहोचले तो सगळा ड्रामा रात्रभर चालला, पण त्याच वेळी दिल्लीत कुठलाही अनुचित प्रसंग घडू नये यासाठी केजरीवाल यांच्या घराभोवती तसेच दिल्लीतल्या संवेदनशील ठिकाणी रॅपिड ऍक्शन फोर्स तैनात करण्यात आला होता. याचा अर्थच केजरीवाल यांना आपण हात लावतोय म्हणजे काय करतोय??, हे केंद्रीय गृह मंत्रालयाला निश्चित माहिती होते. त्यामुळे केजरीवालांची जी काही अटक झाली ती अजिबातच “सरप्राईज” किंवा विरोधक म्हणतात तशी राजकीय सूडबुद्धी वगैरे नव्हती. पण तरी देखील केजरीवालांना अटक झाल्याबरोबर सगळे विरोधक केजरीवालांभोवती झुंड करून उभे राहिले.
शरद पवारांपासून सीताराम येचुरींपर्यंत आणि ममता बॅनर्जी यांच्यापासून एम. के. स्टालिन यांच्यापर्यंत सगळे ज्येष्ठ नेते केजरीवालांना अटक करणे हा लोकशाहीचा खून करण्यासारखे आहे, असे बोलते झाले. यातल्या प्रत्येकाने ट्विट करून मोदींना भरपूर शिव्या घातल्या. त्यांना हुकूमशाह म्हटले. निवडणुकीच्या तोंडावर विरोधकांच्या विरोधात सूडबुद्धीने वागणारे सरकार अशी दूषणे दिली. यापैकी मोदींना दिलेल्या शिव्या आणि सरकारला दिलेली दूषणे मोदींसाठी ही बिलकुल नवी नव्हती. असल्या शिव्या मोदी वर्षानुवर्षे खात आले आहेत. या शिव्यांनीच मोदींच्या राजकीय कारकिर्दीचे “भरण पोषण” केले आहे. “मोदींना जेवढ्या शिव्या, तेवढी त्यांची प्रतिमा उजळ!!”, असे चित्र अख्ख्या भारताने अनुभवले आहे. पण त्यातून विरोधक काही धडा शिकू शकले नाहीत, हा भाग अलहिदा!!
पण त्या पलीकडे जाऊन खरा राजकीय परिणाम केजरीवालांच्या अटकेने साधला, तो सत्ताधारी भाजपवर साधण्यापेक्षा विरोधकांवरच साधला गेला. तो म्हणजे आतापर्यंत राहुल गांधींभोवती जमा होत राहिलेले सगळे विरोधक राहुल गांधींना sidetrack करून केजरीवालांभोवती जमा झाले.
राहुल गांधींच्या नेतृत्वाचा आभास कोसळला
राहुल गांधी भारत जोडो न्याय यात्रेमध्ये तब्बल 10000 किलोमीटर चालले होते. यात्रेत विरोधकांचे काही रुसवे फुगवे जरूर झाले, पण तरी देखील हो नाही करत का होईना, पण बरेच विरोधक त्यांच्याबरोबर थोडा वेळ का होईना, पण यात्रेत चालले. त्यामुळे सगळ्या विरोधकांनी राहुल गांधींना नेतृत्व दिल्याचा आभास काँग्रेसजनांना निर्माण करता आला. पण अरविंद केजरीवालांना अटक झाली आणि काँग्रेसचा हा सगळा “आभास” क्षणार्धात कोसळला. शेवटी राहुल गांधींना देखील ट्विट करून केजरीवालांचे समर्थन करावे लागले. त्यामुळे इथून पुढची लोकसभेची फाईट पंतप्रधान नरेंद्र मोदी विरुद्ध तुरुंगात गेलेले अरविंद केजरीवाल अशी झाली तर आश्चर्य वाटायला नको त्यात राहुल गांधींची गाडी संपूर्ण भारतभर फिरूनही sidetrack वरच गेली असे म्हणावे लागेल!!
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App