केजरीवाल यांना आज दुपारी दिल्ली उच्च न्यायालयातून दणका बसला, आहे.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली: दिल्ली दारू धोरण घोटाळा प्रकरणात मोठी बातमी येत आहे. उच्च न्यायालयाकडून दणका दिल्यानंतर अंमलबजावणी संचालनालयाचे (ईडी) पथक दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घरी पोहोचले आहे. एसीपी दर्जाचे अधिकारी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी पोहोचले आहेत.Regarding the Delhi liquor scam the ED team reached Kejriwals house
केजरीवाल यांच्या घराबाहेर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दिल्ली मद्य घोटाळ्याची ईडी चौकशी करत आहे. ईडीचे तपास अधिकारी केजरीवाल यांची चौकशी करत आहेत. त्यांच्या घराचीही झडती घेतली जात आहे.
दरम्यान, केजरीवाल यांची कायदेशीर टीम सर्वोच्च न्यायालयात पोहोचली आहे. केजरीवाल यांची टीम उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार आहे. अरविंद केजरीवाल यांना आज दुपारी दिल्ली उच्च न्यायालयातून दणका बसला. अटक रोखण्याची मागणी उच्च न्यायालयाने फेटाळून लावली होती.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more